shabd-logo

प्रेमाची अंतयात्रा

20 सितम्बर 2021

77 बार देखा गया 77

मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता दुपारची वेळ होती सुर्य आग ओकत होता उष्णता प्रचंड वाढल्याने अंगाची लाही ,लाही होत होती. प्रचंड ऊन वाढल्या मुळे शारीरातुन घामाच्या धारा लागल्या होत्या .आज वेगळच वातावरण आहे सर्वत्र भयान दिसत होते .
शेतातील  सगळी जनावरे चरायचे सोडून उन्हा मुळे झाडाच्या सावलीत बसली होती  आबा आणि दामू हे दोघे गुराखी धापा देत झाडाखाली सावलीत येऊन बसले होते
.टिटवी पक्षी  टीव , टीव करीत गावा वरून सारख्या चकरा मारीत होती .असल ऊन माझ्या आयूष्यात नाही बघीतल असे दामु अबा ला  सांगत होता  . खरय लका लईच उन हाय  असल्या उनात गावात लग्न हाय आज, लईच अबदा होईल वराडाची असे अबा  दामुला  सांगत होता . दामू म्हणाला अबा मला जरा आज उदासच वाटतय लका ,टिटवी लईच ओरडतीय आज काही तरी अशुभ घटणा घडती की काय असे  म्हणत दोघे गुराखी गप्पा मारीत होते .

उंच डोंगर  दऱ्यांनी  वेढलेल्या सुंदर अश्या  छोटयाश्या कुंथलगीरी गावातल्या  संगीताचे आज लग्न होते  लग्नाची वेळ संध्याकाळी ५ - ३०  वाजताची होती गावात लगीन घाई सुरू झाली होती . अमीत चे मन आज खुपच अस्वस्थ झाले होते  संगीताचे लग्न होऊन ती आपल्या पासुन लांब जात असल्याने  अमित वर दुःखाचे डोंगर कोसळले होते घरात न रहावल्याने तो गावा लगतच्या एका उंच डोंगरावर गेला त्याला सारखा सारखा संगीताचा चेहरा समोर दिसत होता संगीताला विसरने त्याला अशक्य झाले होते. तो एक टक लाऊन गावातील लग्नाच्या हलचाली  कडे उदास मनाने बघत होता.

वातावरणात बदल होत गेला अकाशात ढगांची रेलचेल झाली  सुसाट वादळी वारा सुरू झाला होता विजेच्या कड कडाटीने डोंगर दरी हादरून गेली  कोकीळा चे मधुर अवाज डोंगराच्या दरीत पसरत होता वातावरणात गारवा निर्माण झाला होता पण   संगीताच्या आठवणीने अमीत अस्वस्थ झाला होता  उंच डोंगराच्या  मोठया दगडावर बसल्याने संपुर्ण कुंभलगीरी गाव व परिसर  स्पष्ट दिसत होते .
संगीताच्या लग्नाची वेळ जवळ आली होती पाहुणे मंडळी हजर झाली होती  एवढयात संगीता च्या लग्नाची मंगल आष्टीका डोंगर दऱ्यात पसरली मंगल आष्टीका अमीत च्या काणावर पडली
॥ स्वास्ती ~ श्री गणनायकम,  ~गजमुखम ~मोरेश्वरम ~सिध्ददम ॥    मंगल आष्टीकेचा अवाज काणावर  पडताच अमीत च्या ह्रदयावर घाव पडल्या सारखे झाले आणी  अमितने जोराची कींचाळी मारली  सं ~~गी ~ता ,   डोंगर दरीतुन  सं ~गी ~ता , ~~ सं ~गी ~ता   च्या प्रति ध्वनी अवाजाने घुमू लागल्या व अमीत ने उंच डोंगरा वरून स्वताःला झोकुन दिले 
अमीत डोंगरा वरून गडगडीत गावाच्या मुख्य रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात  येऊन पडला , व सर्व काही संपले होते .

कुंथलगीरी हे उस्मानाबाद जिल्हातील छोटेसे गाव चारी बाजुने डोंगर दऱ्यारे वेढलेले हिरवीगार झाडे ठिक ,ठिकाणी पाण्याचे वाहणारे झरे निसर्ग सौंदर्याने बहरलेला   येथील लोकांचा  शेती व दुध उत्पादन व्यावसाय गावात सुंदर अशी जिल्हा परिषदेची  शाळा.  आशाबाई आणी गंगाधर यांचा अमीत हा एकुलता एक मुलगा शाळेत हुशार होता माध्यमिक शिक्षण झाल्यावर कॉलेज ला बाहेर गावी अॅडमीशन घेतले होते बसचे पास काढले असल्याने रोज येने , जाने करीत होता  .
संगीता  गावातील सर्वांत सुंदर मुलगी होती तिचे हरीणा सारखे टपोरे डोळे उंच बांधा बघुन अमीत घयाळ झाला होता ९ वी वर्गात असतानाच अमीत तिच्यावर मरत होता .हे संगीताला देखील कळत होत  मात्र अमीत तिला सांगण्याची हिम्मत करत नव्हता कारण संगीता ही त्यांच्या कुंटूबाच्या वैऱ्याची मुलगी होती .
शेतीच्या वादातून ३० वर्षा पुर्वी  दोघांच्या कुटूंबात वाद होऊन आमीतच्या काकाला कायमचे अपंगत्व आले होते  तेव्हा पासुन या दोन्ही कुटूंबाची दुष्मणी कायम होती ही घटणा अमीत , आणी संगीता यांच्या जन्मा पुर्वीची होती या दोघांना फारसा ईतिहास माहित म्हवता पण दोन्ही कुटूंब कधीच बोलत नव्हते हे त्यांना माहित होते .

अमीत एकुलता एक असल्याने लहान पणा पासुनच आई वडीलांचा लाडका होता तिचे सर्व हट्ट आई वडील पुरवत होते   बघता , बघता अमीत मोठा झाला होता त्याची  संगीता विषयी ओढ वाढतच होती त्याचे मन अभ्यासात लागत नव्हते  संगीता चे अॅडमीशन  त्याच कॉलेज मध्ये झाले  होते  .
दोघेही आपल्या गावा पासुन लांब असल्याने अमित ने एक दिवस ठरविले आज संगीता ला बोलायचेच व कॉलेज सुटताच तिच्या मागे ,मागे जाऊ लागला मात्र काय बोलावे अमीतला सुचत नव्हते कारण पहिल्यांदाच बोलणार होता तीचे ह्रदय भीतीने धडधड करत होते .

अखेर हिम्मत करून अमीत ने अवाज दिला संगीता .
संगीताने मागे वळून पाहिले थोडी दबकत म्हणाली काय ?

अमीत  - संगीता  खुप दिवसा पासुन विचार करतोय तुला  बोलाव म्हणुन अवाज दिला .

संगीता - काय बोलायचे आहे असा प्रश्न संगीताने करताच

संगीता रागावतेय की काय म्हणुन घाबरत  अमीत - मला केमीस्ट्रीच पुस्तक पाहिजे होते म्हणुन विषय जरा बदलला
ठिक आहे उदया देते म्हणुन संगीता निघून  गेली

संगीता त्याच्या सोबत साकारात्मक बोलली म्हणुन अमीत  मनात खुष होता दिवसा वर दिवस जात होते अमीत आता संगीताचे स्वप्न  बघत होता .एके दिवशी संगीताला कॉलेज मधल्या एका टवाळ पोराने संगीताला बघून ए जानू कशी आहेस असे म्हणत छेड काढली यावर अमीत ला रहावले नाही त्याने त्याच्या कानफडात मारली व पुन्हा जर छेडल तर सोडणार नाही असे म्हणत त्याला धक्का देत बाजुला केले
यावर तो  टवाळखोर प्रचंड चिडलेला होता व तुला बघुन घेईन अशी धमकी देऊ लागला अमीत पुन्हा त्याच्या अंगावर धावला मात्र  संगीताने अमीतला धरले व अश्यांच्या नादी लागू नको म्हणुन बाजुला खेचले .

या प्रसंगा मुळे अमीत आणी संगीता मधील अंतर कमी झाले होते ते एक दुसऱ्याला मन मोकळे पणाने बोलू लागले होते आमीत खुप आनंदी झाला होता दोघात चांगली मैत्री झाली होती एक दुसऱ्याची काळजी घेत होते दोघांच्या कुटूंबाला याची काहीच माहिती नव्हती . दोघे घरच्यांना चोरून भेटत होते   एके दिवशी अमितने डबा आनला नसल्याचे तो लॅन्च वेळी एका ठिकाणी बसुन होता.

संगीता - आज जेवणार नाही का ?
अमीत - नाही
संगीता _  का ?
अमीत  - डबा तयार झाला न्हवता
संगीता - हा घे माझा डबा
अमीत - नको तु खाऊन घे
संगीता - अरे घेना काय झाल
अमीत - तु उपासी राहील्यास मला नाही आवडणार
संगीता - मग आपण दोघे खाऊ
अमीत - ठिक आहे असे म्हणत  दोघे एकत्र बसुन जेवत असताना अमीत फक्त तिच्या कडेच बघत होता अमीत संगीतावर खुपच प्रेम करू लागला होता त्याला तिच्याशिवाय करमतच नसे .

संगीता - अरे काय करतोस घेना
अमीत _ पोट भरले
संगीता - अरे काही खाल्ले नाही आणी पोट कसे भरले तुझे?
अमीत - संगीता तुझी शप्पथ पोट भरल तुला पाहुनच असे  म्हणताच संगीताच्या  ऱ्हदयाचे ठोके वाढले .
          
संगीता च्या डोळ्यात देखील प्रेम दिसत होते पण व्यक्त करण्याची धाडस केली नाही आता दोघे एक मेकांच्या प्रेमात बुडत चाचले होते 
संगीताच्या डोळ्यात प्रेम पाहुण आमीत आनंदी झाला होता १२ वीचे वर्ष कधी संपले दोघांनाही कळाले नाही परिक्षा झाल्या सुट्टया लागल्या होत्या दोघेही  कुटूंबाच्या भितीने गावात समोरा समोर आले तरी  भिती पोटी बोलत नसत  पण आता  काही झाले तरी संगीता ची भेट घ्यायची व सरळ सांगायचे  तुझ्यावर प्रेम करतो म्हणुन असे अमीत ने   मनात ठरविले होते मात्र छोटेसे गाव संधी मिळत न्हवती .

एके दिवशी संगीताला लग्नासाठी स्थळ आले मुलगा इंजिनियर आहे घरचे  चांगले आसल्याने संगीताच्या वडिलांनी तयारी दर्शवीली मुलगी देखील पसंत पडल्याने त्यांनी साखर पुड्यातच लग्नाचा प्रस्ताव मांडला संगीताच्या वडिलांनी पैश्याची अडचण असल्याने एक महिन्यात लग्न करून देऊ म्हणाल्याने वर पक्षाने देखील मान्य केले.
ईकडे संगीताला एवढया लवकर लग्न करू वाटत न्हवते इंजिनियर पती मिळत असला तरी   तिच्या मनात अमितने घर केले होते ती  दुःखी .झाली होती तीला अमीत ची आठवण येत होती पण काय करणार अमीतला बोलायची पण चोरी आहे दोघांच्या कुटूंबात खुप  जुनी  दुष्मणी होती रक्तपात होईल पण लग्न होणार नाही याची तिला खात्री होती म्हणुन ती निमुटपणे सहन करीत लग्नाला राजी झाली होती .

संगीता चे  लग्न जुळल्याची बातमी  अमित ला समजताच अमीत  ला खूप दुःख  झाले मन अस्वस्थ झाल्याने अमीत च्या डोळ्यात आश्रृच्या धारा वाहू लागल्या आपल स्वप्न भंगत आहे या मुळे बेचैन झाला कोणत्याही परिस्थीत संगीताला भेटून  मनातील प्रेम व्यक्त करायचे  म्हणुन भेटण्याची संधी शोधू लागला दुसऱ्या दिवशी संगीता शाळेतील हपस्यावर पाणी भरत असल्याची दिसल्याने अमीत ने घरातून घागर घेऊन हपस्यावर गेला तिथे संगीताला पाहुन मन भरून आले  कंठ दाटला होता  डोळ्यात आश्रृ आले होते .

अमीत - संगीता मी तुझ्यावर खुप प्रेम करतो तुझ्या शिवाय जगणार नाही  ग
,
संगीता - आपल्या प्रेमाला भविष्य नाही , खुप मोठा अनर्थ घडेल तु मला विसरण्याचा प्रयत्न कर

अमीत - मग आपण पळून जाऊन लग्न करू मी तुझ्या शिवाय जगणार नाही ग तुझी शप्पथ

संगीता - माझे लग्न जमले आहे ,

अमित -   तु होकार लगेच कसा दिला, संगीता मला माहित आहे तुझे पण माझ्यावर प्रेम आहे, संगीता प्रेमाचा बळी नको देऊ ग

संगीता -  अमित माझे पण तुझ्यावर प्रेम आहे रे  पण , तुझ्या आणी माझ्या कुटूंबा मध्ये एक शत्रुत्वाची भिंत आहे .

अमीत - संगीता ही शत्रुत्वाची भींत आपण पाडू मी आहे तु फक्त हो म्हण . प्रेमाचा बळी देऊन तु बोहल्यावर चढू नको

संगीता - अमीत ते शक्य नाही  दोन्ही कुटूंबात रक्तपात होईल  तु मला विसर मला तुझी काळजी वाटते रे दोघांचे बोलने सुरू असताना संगीताच्या वडिलांची नजर दोघावर पडते ते संगीता म्हणुन ओरडताच संगीता घागर घेऊन घरी जाते .

संगीताचे वडील रागातच काय बोलत होती त्याच्या बरोबर
संगीता _ काही नाही ,
तिचे वडील - खर सांग नाही तर कुऱ्हाडीनेच तोडतो त्या भडव्याला असे म्हणताच संगीता घाबरली काय होणार आता या भीतीने  ती रडू लागली तेवढयात संगीताची आई स्वयपाक सोडून आली काय झाले आहे . सर्व प्रकार वडिलांनी सांगीतल्या वर आईने संगीताला समजुन सांगीतले तुझे लग्न ठरले आहे अशी चुक पुन्हा करू नको .

संगीताचे वडील अमीतच्या घरी  जाऊन गंगाधर बाहेर ये जोरात ओरडतो तुझ्या पोराला निट समजुन सांग माझ्या पोरीला जर चुकुनही बोलला तर वाईट घटणा घडेल असे म्हणुन निघुन गेला .

अमीत च्या आई वडिलांना कसलीच कल्पना न्हवती अमीत आल्यावर सर्व हकीकत ऐकुन घेतली  त्यांनी अमीतला समज दिली  होती  मात्र अमीत ने आता संगीताच्या शिवाय जगायच नाही असा निश्चय केला होता तो उदास झाला होता त्याला आयूष्य नकोसे वाटू लागले होते . आई वडीलांना देखील अमीत ची काळजी वाटत होती त्याला सतत धीर देत होते मात्र अमीत प्रेम विरहाच्या दुःखात पुर्णत बुडाला असल्याने तो एकाकी झाला कोणा बरोबर ही बोलत नव्हता .

काही दिवसा नंतर .आज संगीताचे लग्न होते अमीत प्रचंड उदास झाला होता अनेक वर्षाचे प्रेम आज आपल्या पासुन कायमचे  लांब जात आहे हे त्याला सहन होत नव्हते  लग्नाची घटीका जवळ आली होती अमीत डोंगराच्या उंच कडेवरून सर्व काही पहात होता एवढयात मंगल आष्टीका का अवाज आला आणी अमितने  डोंगरावरून स्वताला झोकुन दिल होत अमीत चे प्रेत रस्त्यावर पडल्याची खबर गावात पसरताच अनेकांनी धाव घेतली  अमीत च्या आईला माहिती मिळताच आई बेशुध्द पडली होती वडीलांच्या  शरीरात तर प्राण नसल्या सारखे झाले होते त्यांच्या कुटूंबावर  दुःखाचे डोंगर कोसळले होते .

अमीत च्या आई ला शुध्द येताच बेभान होऊन आमीत च्या प्रेता कडे धावत सुटली काळजाचा तुकडा आज सोडून गेला होता  कीती स्वप्न बघीतले होते ते सर्व स्वप्न  आज जळून खाक झाली होती . अमीत च्या प्रेताला कवटाळून  रडत होती बाळा उठरे बघना तुझी आई आली रे डोळे उघड तु इंजिनियर होणार होतास ना मग अस का केल बाळा मी आता कोणा साठी जगुरे . तु जर असा करशील माहित झाल असत ना तर तुझे प्रेम मिळवुन देण्या साठी मी माझा जिव दिला असता पण तुला मरू दिल नसत मला सोडून जाऊ नको रे माझ्या बाळा, मी कोणा साठी जगु रे , देवा मी काय करू रे मला हे दिवस का दाखवले आधीच मरण का नाही दिले  .
अशी म्हणत रडत होती हे पाहुन तेथे हजर असलेल्या लोकांना हुंदके आवरता आले नाही सर्वच रडत होते .
दोघा , तिघांनी तिला बाजुला  घेतले  अमित चे  प्रेत गावात नेहण्यात आले  नातेवाईक पाहुणे   यांना माहिती मिळताच  गावात पोचले होते. 
गावात शोककळा पसरली होती सर्वत्र दुःखद वातावरणात होते अंत यात्रेची तयारी झाली व घरा पासुन अंत यात्रेला सुरुवात झाली होती तर तिकडे संगीता चा लग्न सोहळा पार पडला होता नवरी ला घेऊन जान्या साठी गाडीला फुलांनी सजविले होते नवरी , नवरदेव गाडीत बसुन सर्वाचा निरोप घेऊन निघाले होते तेवढयात  अमीत ची प्रेत यात्रा समोरून जाताना संगीता ला दिसली  आणी अभाळ कोसळल्या सारखे झाले डोळ्या समोर अंधारे आले होते ह्रदय पिळऊन टाकल्या सारखे झाले मोठयाने  रडुन मन मोकळे करावे असे संगीताला वाटत होते मात्र मनातील दुःख व्यक्त करता येत नव्हते .

डोळ्यातुन आश्रृ वाहू लागले आपल्या प्रेमाची अंतीम यात्रा पाहुन संगीताला  धक्का बसला  होता  संगीता तुझ्या शिवाय मी जगणार नाही हे अमीत ने खरे करून दाखविले होते  अमीत खूप लांब गेला होता कधीही न परतन्या साठी   संगीताने अमीतला गाडीतुनच जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला . 

,,,,,,,,
  कृपया आपल्या प्रतिक्रीया  कमेंट मध्ये कळवा

                                । समाप्त I


Nisar Mujawar

Nisar Mujawar

धन्यवाद

20 सितम्बर 2021

Shivansh Shukla

Shivansh Shukla

शानदार रचना 👌👌🙏

20 सितम्बर 2021

Shailesh singh

Shailesh singh

बेहतरीन रचना 👌👌👌

20 सितम्बर 2021

1
रचनाएँ
लघू प्रेम कथा
5.0
ग्रामीण प्रेम कथा , कवीता मराठी वाचका साठी प्रेम कथा कवीता

किताब पढ़िए

लेख पढ़िए