ऐन पावसाळ्याचे दिवस होते. दुपारी बसस्थानकावर प्रवाश्यांची खूप गर्दी झाली होती.पंढरपूरला महिन्याचा एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचा दर्शनासाठी भाविक येत जात होते.आकाशात वरती काळ्या ढगाची गर्दी झाली होती.काही वेळात पाऊस पडेल अशी सर्वांना खात्री झाली होती ...त्याला पुण्याला जायचं म्हणून बस स्थानकावर वाट बघत थांबलेला तो,तो म्हणजे "आकाश".
बसची चौकशी करून आल्यावर समजलं की मंगळवेढा स्वारगेट बस पंधरा मिनिटांनी फलाट क्रमांक एकवीस वर येईल.आकाशात ढग जमा झाले होते.पण त्याला आता पाऊस आवडत नव्हता.पावसाचा तिरस्कार वाटायचा.
त्या जुन्या आठवणी त्याला त्रास देयचा.त्यामुळे त्याला पक्क ठाऊक होते. यावेळी पण पाऊस बरोबर आडवा येणार.. तेवढ्यात धो धो पाऊस कोसळू लागला..पंधरा मिनिट झाले.मंगळवेढा स्वारगेट बस पंढरपूर च्या स्थानकावर फलाट क्रमांक एकवीस वर आली..बस कडे प्रवासी धावले .पाऊस तसाच कोसळत होता.बस मधून प्रवासी उतरत होते आणि बसमध्ये चढण्यासाठी साठी पण गर्दी तेवढीच होती.पाऊसात भिजत थांबून बसमधे चढावे लागणार होते.आणि बस मध्ये बसून जाण्यासाठी जागा मिळेल का नाही याची खात्री नव्हती.त्यामुळे पुढच्या बस ने जाऊया म्हणून तो तसाच स्थानकात थांबला ....तेवढयात बस मधून उतरलेली ती त्याला दिसली. ती म्हणजे "वर्षा"...तिच्या वडिलांसोबत बसमधून उतरली होती.तिला पाहिलं आणि याचा काळजात धस्स झालं..तिचा तो काळवडलेला उदास गोरा चेहरा त्याला बघवला नाही.
सात वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये एकत्र शिकणारी ही जोडी "प्रेम पाखर" म्हणून कॉलेजमध्ये फेमस होती.पण ती आज दुसऱ्यासोबत संसारात रमली होती.हे त्याला चार वर्षांपूर्वी मित्राने फोन करून सागितलं तेव्हा समजलं होते होते.पण आताचा तिचा विचित्र अवतार त्याला बघवत नव्हता. ती ही वर्षा नाहीच ..वेगळीच कोणीतरी आहे असे त्याला वाटत होते.ज्या पावसाने दोघांना एकत्र आणलं होतं तोच पाऊस आज ही दोघाच्या सोबत होता.दोघांना दूर करण्याचे कारण ही पाऊस होता. म्हणून त्या दोघांना ही पावसाचा प्रचंड राग होता.
दोघे ही पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होते.सात वर्षानंतर आज आकाशने वर्षाला पाहिले होते.ते ही या अवस्थेत.
तिला कुठल्याही पावसात भिजायला आवडयचं अगदी बेभान होऊन पाऊस अंगभर गोंदवून घेण्यासाठी तर ती वेडीपिशी होऊन जायची,याला पण पाऊस तेवढाच जीवापाड होता..पाऊस पडला आणि हा भिजला नाही असे कधी झाले नाही.लहानपणापासून आईचा ओरडा खायचा.तरीही हा पावसात भिजयचा.पण हव्या त्या वेळी, हव्या त्या ठिकाणी आणि आपल्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीसोबत पावसात भिजण्याची प्रत्येकाची इच्छा असते.ती लवकर पूर्ण होतेच असे नाही.पण कॉलेजमध्ये आल्यावर दोघांची इच्छा पूर्ण झाली होती. तिला आणि त्याला वेडावणाऱ्या पावसाची ही गोष्ट. कडक उन्हाळा,त्रासदायक उन्हाळा,आया मौसम थंडे थंडे ड्रमी कुल का ही टिव्ही वरील जाहिरात दिसणं बंद झाली की समजयचं पावसाळा आला. कारण उन्हाळा मागे पडून मुसळधार धार पाऊस पडत पावसाळा सूरु होयचा.तो म्हणजे जून महिना.त्या दोघांचा जन्म हा पावसाळ्यात ला जून महिन्यातील.
हीच नाव वर्षा.ह्याच नाव आकाश. दोघेही एकमेशिवाय अधुरेच.जसे निर्गामध्ये आकाश आणि वर्षा यांचं घनिष्ट नातं होतं.तसेच या दोघांचे ही काही वर्षापूर्वी घनिष्ट नाते होते.
दोघांचे ही पाऊसासोबत मस्त जुळून येयच.दोघांना ही पावसाची प्रचंड आवड.त्यामुळे त्या दोघांनी ही आयुष्यातला पहिला पाऊस,पहिला पावसाळा पाळण्यातूनच बघितला अगदी इवल्या नाजूक डोळ्यांनी.दुसऱ्या पावसाळ्यात मात्र त्यांना पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेण्यापासून कुणीही रोखू शकलं नाही.पावसातलं त्यांचं नटखट रूप बघून घरातील सगळ्यांना आनंद झाला होता.कित्येक पावसाळे आले आणि गेले रांगायला,चालायला लागलेली असताना कुतूहल म्हणून त्यांचे पावसात भिजणं हळूहळू मागे पडत गेलं होते.जसे जसे मोठे होऊ तसे प्रत्येकाचे कुतुहुल मागे पडते.पाऊस आला की " "येरे येरे पाऊसा तुला देतो पैसा , पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा" असे गाणं म्हणत मित्रांना सोबत घेऊन नाचणारा तो. आणि हिला आभाळात ढग जमा झालेले दिसले की,ही पण गाणे म्हणयची सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय..? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय..?" दोघांना ही आपलासा वाटायचा पाऊस. तिला शाळकरी वयात फक्त माहीत होतं दप्तर न भिजवता, एका हाताने छत्री धरून दुसऱ्या हाताने गणवेश सावरत, वाटेत आडवे येणारे खड्डे चुकवत घर गाठणं. हा मात्र पावसात मनसोक्त भिजत भिजत घरी जायचा.आणि आईचा ओरडा खायचा किंवा कधी मार ही खायचा.कधी कधी तर मुसळधार पावसात कपडे, दप्तर भिजण्याची परवा न करता सायकल दामटवत रस्त्यावरून बेफिकीरपणे पावसात भिजयचा.
तिलाही असाच मुलांचे सतत कौतुक वाटत राहायचं.
तीलाही या बेफिकीरीने पावसात मनसोक्त भिजण्याची इच्छा होयची.पण तिचा हातात मात्र खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून तळहातावर पाऊसथेंब झेलण्या इतपत नशीब लिहलं होते. पण कधी कधी ही पण मैत्रींणींसोबत मजा म्हणून पावसात भिजायची. हिला आईचा ओरडा मिळायचा आणि पुढे चार दिवस गळणारं नाक घेऊन तसेच अथरूणात लोळत राहायला लागायचा.हा मात्र पैलवान होता.मस्त तालमीत व्यायाम करायचा.खुराक वैगेरे खाऊन तंदुरुस्त असायचा.
पावसात भिजल्यावर याला कसलाच फरक पडत नव्हता.पण खऱ्या अर्थाने दोघांना ही पाऊस जास्त जवळचा वाटला जेव्हा हे दिघेही शिकण्यासाठी पुण्याला गेले.त्या वेळी पाऊस एकमेकांना सखा वाटला.हिला मुलगी असण्याची सगळी बंधन झुगारून पाऊस रोमारोमात भरून घ्यावासा वाटला जेव्हा तिला हा पावसाळ्यात भेटला, जेव्हा हे दोघेही कॉलेजमध्ये सर्वात अगोदर यायचे.कारण बस एक तास अगोदर येईची.दोघेही कॉलेज मध्ये थांबले असताना पाऊस सुरू झाला.आणि हा आचनक पावसात जाऊन भिजू लागला.वेडा होऊन सर्व भान हरपून, मनसोक्त नाचू लागला. आनंदाने नाचत होता.त्याला फक्त बरसणार पाऊसाचा स्पर्श जाणवत होता.त्यावेळी एक नवाच पाऊस बहर तिच्यात मुक्कामाला आला. तिला पाऊस जीवलग सखा, प्रियकर वाटायला लागला. ही त्याचा प्रेमात पडली.त्याचा चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद पाहून हिला स्वतःला त्याचा प्रेमात पाडण्यापासून रोखू शकली नाही. तीला वाटायचं रोज यावेळी पाऊस पडावा आणि याला असेच मनसोक्त पावसात भिजताना पाहावे. त्यामुळे ती डोळ्यांत पाऊस आणून पावसाची वाट पाहायला लागली होती.या अगोदर ती फक्त पाऊस येण्याची वाट पाहायची.पाऊस येणाच्या नुसत्या चाहुलीनेही बावरी होऊन जायची.जशी पिवळी हळद लागल्यावर नवरी बावरते अगदी तशी. पाऊस तिला खुणवायचा, हातवारे करायचा. ती मनोमन लाजायची,
तिच्या गालावर खळी पडायची. खट्याळ हसायची. तिच्या कोवळ्या मनात भावना तरारून यायच्या. ती आंतर्बाह्य पावसाळी होऊन जायची.मग सगळी बंधनं झुगारून एका अधिर उत्कटतेने प्रत्येक भेटीवेळी त्याच्या बाहुपाशात शिरून रीती व्हायची.पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने भेटणारा पाऊस मात्र तिला अजूनही परिपूर्ण वाटत नव्हता.चिंब भिजल्या तिच्या मनाचा एक कोपरा
कायम कोरडाच असायचा.काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव तिला व्हायची.काहीतरी सापडले आहे,पण अजून जे खूप मौल्यवान आहे असे काही तरी सापडणे गरजेचे आहे असे तिला वाटायचं. त्या वयात प्रत्येकाचा नजरेला ओढ असते,तशीच हिचा नजरेला ही ती ओढ होती. कुणाची तरी आस होती. पण कशाची आस, कुणाची ओढ...? ही तिला लवकर समजयचं नाही पण त्या मुसळधार पावसात भिजताना त्याला पाहिले आणि तिची ओढ आणि तिची आस याला पूर्णविराम भेटला.तो भेटल्यावरती मनातला तो कोरडा कोपरा ओलाचिंब भिजून गेला होता.तिच्यातल्या वाटणारी अपूर्ण जागा पूर्ण झाली होती होती.तिची मनाची नदी दुथडी भरून वाहत होती. तिच्या मनातल्या आहोटी असलेला समुद्राला भरती आली होती.परत परत दोघेही भर पावसात सोबत छत्री असूनही छत्री न उघडता हात पसरून पाऊस कवेत घेऊन एकत्र नाचू लागले.कोण आपल्याकडे बघते आहे,कोणी काय म्हणत असेल याची पर्वा न करता.दोघेही जोडीने मनसोक्त पावसात भिजू लागले.पावसाइतकेच दोघेही एकमेकांना प्रिय झाले.
जसा पाऊस दोघांचा प्राणप्रिय होता.तसेच या दोघांचे नाते झाले होते.
प्रिय वाटणारा तिचा प्रियकर.पण पाऊस हा दोघांमधला सामाईक दुवा झाला होता.अजून काय हवं होतं त्यांना. तिला पावसाइतकीच त्याचीही ओढ वाटायला लागली. "प्यार हुवा एकरार हुवा हे प्यार मे भिग क्यो डरता हे " हे गाणं रेडिओ वर लागलं की तिला तो नक्की आठवयचा.
"टीप टीप बरसा पाणी , पाणी ने आग लगायी,आग लगी दिलमे तो, दिलं को तेरी याद आयी" हे मोहरा चित्रपपटातील गाणं पाहताना ही त्याला पिवळ्या साडीतील रविना आणि हा स्वतःला अक्षय कुमार समजायचा.
कधी कधी "मेघारे मेघारे, मेघारे मेघारे, मत परदेश जा रे," हे जितेंद्र आणि मौसमी चॅटर्जी चे गाणे रविवारी सकाळी रंगोली ला लागावे अशी दोघांची इचछा असायची..पावसात नाचणारे जितेंद्र आणि मौसमी चॅटर्जी बघून दोघांनीही ते स्वतः आपण असल्याचा भावना जागृत होयचा.सतत पावसाची गाणे ते दोघेही गुणगुणत असायचे.आभाळ भरून आलं की अंगात वारं भरल्यासारखी ती त्याला भेटायला जायची.तेव्हा तो म्हणायचा, " तुझं लाजण म्हणजे जसे की पावसाचा सरी सारख बरसनं" तेव्हा तिचा उभा देह पाऊस होऊन जायचा.तिला त्याच्यासोबत पावसात भिजायचं असायचं. त्याचा हात हातात घेऊन,त्याला बिलगून धोधो कोसळणारा पाऊस मनात देहात साठवून घ्यायची ती.पुणे-लोळवणा लोकल ही त्या दोघांच्या प्रेमाची साक्ष होती.लोनावळ्याचा डोंगरात धो धो बरसणाऱ्या पावसात तर दोघे मनसोक्त भिजयचे.तिच्या ओल्या केसातून ओघळणारे पाऊसथेंब तो तळहातावर घ्यायचा आणि पिवून टाकायचा.तेव्हा भर पावसात भरून आलेले त्याचे डोळे ती त्याच ओल्या तळहाताने पुसायची.
तेव्हा ती म्हणायची, " आपलं लग्न ही पावसात करूया आणि या पाऊसाधारा म्हणजे आपल्या अक्षदा असतील." पावसाचे काही थेंब वरच्या वर अलगद झेलून तो तिच्या ओंजळीत द्यायचा.असे कितीतरी पावसाळ्यातील प्रेमाचे दिवस त्यांनी अनुभवले होते.आणि प्रेमात पावसासोबत जगण्याचा उत्सव केला होता. "परिपूर्ण",मनसोक्त,अतिउच्च,उत्कठ, आकंठ,हे प्रेमात वापरल्या जाणाऱ्या या शब्दांची अनुभूती पावसाळ्याच्या या दिवसांत दोघांना आली होती आणि त्याचा अनुभव घेऊन ते दोघे साक्षात जगत होते. तिच्या ह्रदयात फुलपाखरे उडत होती.ह्रदयाची स्पदने वाढत राहायची. तिच्या आत लपून बसलेला मोर शोधून द्यायला त्याने मदत केली होती.तिनं तो मोर प्राणपणाने जपला होता. त्याच्यासोबतीनं मनमोराचे पिसारा फुलवून नाचणे आतल्याआत अनुभवत राहिली होती.
एकेदिवशी एकविरा आईचे दर्शनासाठी गेल्यावर कारल्याचा लेण्या बघत असताना अचानक पाऊस पडू लागला पावसात मनसोक्त भिजत असताना त्याच पावसाने दोघांसोबत घात केला.एकविरेचा घाट हातात हात घेऊन उतरत असताना त्यांचे हात सुटले. सुटलेले हात ते एकमेकापासून कायमचे दूर होण्यासाठी.म्हणजे त्या पावसाने यांची ताटातूट केली.तिने आणि त्याने भर पावसात,पावसाच्या साक्षीनं हातात हात घेऊन रंगवलेली सगळी स्वप्नं एका क्षणात एकमेकांचा नजरेच्या टप्प्यापासून फार दूरवर वाहून गेली..तो त्या दोघांचा शेवटचा पाऊस होता,परत कधी भेटनं झालं नाही. पण याला विश्वास होता ती पुन्हा येईल दिलेले वचने निभावण्यासाठी.आपला पुढची संसाराची स्वप्ने रंगवण्यासाठी.पण तसे झालेच नाही. ती पण खिडकीचे गज हातात घट्ट पकडून ती पुढचे कित्येक दिवस बाहेरच्या पावसाकडे लक्ष देत बसायची.त्याची वाट बघत , तो येईल आणि मला घेऊन जाईल पुन्हा एकदा पावसात मनसोक्त भिजण्यासाठ.पण त्या खिडकीत बरसणाऱ्या पावसात तो तिला दिसलाच नाही.त्यामुळे तिच्या डोळ्यातूनच अश्रूंचा पाऊस पाडत राहिली.बघता बघता तीन वर्षे झाली.अचानक त्याचा मित्राचा फोन आला.."त्याने जड आवाजात सागितलं.उद्या वर्षाचे लग्न आहे येतोय ना.."त्या मित्राचा आवाज ऐकताच.बाहेर वीजा कडाडली आणि फोन कट झाला,आणि बाहेर धो धो पाऊस कोसळू लागला.त्या बरसणाऱ्या पाऊसाचा वाहत्या पाण्याबरोबर हीच्या आठवणी पण वाहून गेल्या होत्या.तो बाहेर जाऊन पावसात वेड्यासारखा भिजत भिजत रडत राहिला.तेव्हा त्याने पुन्हा कधीच पावसात भिजणार नसल्याचा निरोप त्या पावसाला दिला.तेव्हा पासून तो पूर्ण बदलून गेला.तिच्या विरहात झुरण्याने पैलवान आता काडी पैलवान झाला,तिचं गावं बदललं, तीच लग्न झालं घर बदललं,नाव बदललं घरातली माणसं बदलली, पण पाऊस मात्र होता तसाच राहिला पण हवा हवा वाटणारा पाऊस तिला ही आणि त्याला ही शत्रू वाटायचा.लग्नाचा अगोदर त्याला दूर केलं होतं.नंतर लग्न झाल्यावर याच पावसाने तिच्या नवऱ्याला ही गिळल होते.लग्नाच्या नंतर काहीच दिवसानी पावसात तिचा नवऱ्याचा अपघात झाला होता.त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळं ती पूर्ण हरून गेली होती आणि पावसाला दोषी मानत होती.
ती खाली मान घालून बसली होती...हे सर्व झाल्यापासून
ती एकाकी पडली होती.कोणाशी बोलतच नव्हती.एक जिवंत आत्मा झाली होती.तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते.चार वर्षापासून तिने बोलणं बंद केलं होतं..तिचा अवतार बघून ती पावसात भिजणारी वर्षा एखाद्या अवकाळी पावसासारखी त्याला भासत होती.
तिचा वडीलाजवळ चौकशी केली असता,त्यांनी सर्व हकीकत त्याला सांगितली...ऐकून क्षणभर थबकला..
त्याला सुचन बंद झालं होतं..पण त्याने मनोमन ठरवलं..
तेवढ्यात थोड्या वेळाने स्वारगेट बस आली..तिच्या वडिलांचा नंबर घेऊन ..तो त्यांना विश्वास देऊन गेला..
"काका चार दिवस थांबा" पुण्यावरून आल्यावर तुमची वर्षा पहिल्यासारखी बरसेल आणि पावसात मनसोक्त भिजेल..असा धीर देऊन तो बस मध्ये निघून गेला..
त्याला खूप महत्वाचे काम होते...ज्या पावसाने त्यांना दूर केलं होतं..आज त्याच पाऊसाने त्यांना एकत्र आणले होते..ते पण परत कधी दूर न होण्यासाठी...त्याने मनोमन ठरवलं होतं..पुण्यावरून आल्यावर वर्षाला मागणी घालायची.रेशीम नात्याचे तुटलेले बंध पाऊसाने पुन्हा एकदा जुळवले होते .
My smile...