shabd-logo

माझी सुपरस्टार आई...

17 सितम्बर 2021

65 बार देखा गया 65

खरे सांगू मित्रहो...
आजही माझी आई अनपड आहे, कधी जेवतांना चपाती एक मागतो तर ती कधी दोन आणून ताटात ठेवते, आईच्या अश्याच आठवणी आपल्या सर्वांनाच असतील...👩‍🍼
आई ही सर्वांची जागा घेऊ शकते पण आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या आइचे मन आणि हृदय कधीच दुखवू नका, कारण ती आपल्या आनंदासाठी काहीही करायला तयार असते,
" प्रत्येक नात्यांमध्ये भेसळ बघितली,
कापडाच्या कच्चा रंगांमध्ये सजावट बघितली,
वर्षांनुवर्षे बघितली त्या आईला,
तिच्या चेहर्‍यावर कधी थकावट नाही बघितली ...!!😍"
आज परत निघून गेलेल्या जीवनाची आठवण येते, आज परत त्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते...!!🥰
दिवसभराची थकावट जेव्हा पोटाच्या भुकेने बदलते, तेव्हा आईने आपल्या हाताने भरविलेला खास आठवतो,
कधी पत्र लिहून आईला बोलावेसे वाटते...! त्यात लिहावेसे वाटते,
"अगं..तू तुझ्या हातचे मारून मुटकून खाऊ घातलेले आठवते आज, माझ्या शिक्षणासाठी तुने तुझ्या मेहनतीने जमवलेले पैसे आठवतात मला आज...!!
कधी समजू नये मला त्या घरातल्या अडचणी ते तुझे खोटे बोलून हसणे आठवते गं..मला आज...!!
कधी सोडून जाते कुठे तू आई मला, तुझ्या आठवणीत मी रडत बसलेला आज आठवतो मला...!!
मित्रहो, या जीवनाच्या वाटेवर चालतांना आपण खूप पुढे निघून आलो असे वाटते आहे....
ते नवीन नाती बनवतो,  नवीन मित्र बनवतो , आपल्या जीवनात एवढे गुंग होऊन जातो की त्या जन्मदात्या आईचे हाल विचारण्यासाठी आपल्याला कधी वेळच मिळत नाही, कधी एक फोन लावून विचारावेसे सुद्धा वाटत नाही का...??
आपण त्या आईला विसरून तरी कसे जातो तिने आपल्या नऊ महिने तिच्या पोटात घेऊन आपले ओझे वाहिले, कधी आपल्याला तिच्या गर्भात संकटांना सामना तिने करू दिला नाही.
कष्ट,दुखणे हे सर्वच तिने आपल्या माथी बांधले, आणि आपल्याला तिच्या गर्भात सुखरूप ठेवले, आईच्या गर्भात कधी आपल्याला माया, मोह, मत्सर,द्वेष, राग, रुसवा या कधीच जाणवल्या नाहीत, कारण तेव्हा आपण फक्त आपलेच होतो. आपले मुक्तपणे जीवन जगत होतो, या सर्व गुणांपासून आपण दूर राहत होतो, हे काम फक्त तीच करू शकली, तिच्या गर्भातून बाहेर येऊन दुःखी,कष्टी दुनिया बघायला मिळाली, नऊ महिने नऊ दिवसाची कष्ट ती स्वतः भोगत  राहिली.
आपणा सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा पूर्ण दुनिया ही आपली सोबत देण्यास नकार ते पण आपली आई मात्र आपणास कधीच नाकार करत नाही की आपली सोबत कधीच सोडत नाही. कित्येक वेळेस ती आपल्या भल्यासाठीच विचार करत राहते, कोणीतरी किती छान लिहिले आहे ..
" मेरी तकदीर मे एक ही गम ना होता l
अगर तकदीर लिखने का हक खुदाने  मेरी माँ को दिया होता l "
एक तेवढेच खरे आहे, की आपले वय कितीही असले तरी, जेव्हा आपणास ठेच लागते किंवा अति वेदना होतात, तेव्हा मात्र आपल्या तोंडातून न चुकता "आई गं..!!!" हा शब्द बाहेर येतो.
जेव्हा आपन लहान असतो तेव्हा आपल्याला नीट बोलायला येत नाही, तेव्हा आपली आई आपल्याला न बोलताच समजत असते, आणि आज असे होते आहे की,आपण प्रत्येक गोष्टीवर पटकन बोलून टाकतो आईला.
" अगं सोड ना...आई...! तुला काय समजते त्यातले..!!"
" खरं सांगू आई आजही तुझ्या हातचा त्या प्लास्टिक डब्यात दिलेल्या दोन चपात्या कधी आवडायच्या नाही मला नेहमीच नाक मोडायचे मी त्यावर... तरीदेखील त्या दोन चपात्यानी  माझे पोट भरायचे गं.. आई...!!"

" खरं सांगू आई...!! त्या महागड्या हॉटेलातल्या चपातीने  माझ्या पोटाची भूक आजवर ही थांबत नाही गं...!"
" भरलेल्या घरात तू नाहीस म्हणून नजर शोधते तुला आजही घरभर...!!"

" थंडीपासून संरक्षण व्हावे माझे म्हणून मी घेतले अंगावर पांघरून, त्या तुझ्या कुशीतली उब मला आजवर ही कोणी नाही देऊ शकले गं, मात्र तू सोडून जाता जाता देखील तुझ्या साडीचे उबदार पांघरुण करून गेलीस...!!" त्या तुझ्या कुशीतील उबे मुळे कुठे माझ्या अंगावरची थंडी कुठे गायब  व्हायची कोण जाणे..? "

" माझ्या स्वप्नांसाठी तू केली तुझ्या जीवनाची राखरांगोळी, हे फक्त तु आणि तूच माझ्यासाठी करू शकली, गं.. आई..!!"
मित्रहो...
खरे सांगू आपणास...!
आईची दुवा कधी खाली जाणार नाही, आई ची दुवा कधी टाळली जाणार नाही...!
" दुसऱ्याचे भांडे धुणे करून देखील ती आई आपल्या तीन-चार पोरांना सहज सांभाळून घेते.
परंतु जीवनाचे कठोर सत्य हे आहे की, तीन चार मुलांकडून आपली एक आई नाही सांभाळली जात आज ....!!"👩‍👦‍👦
आई ही आपल्या जीवनात एकमेव व्यक्ती अशी आहे, की,ती वर्षाचे 365 दिवस न सुट्टी घेता न पगार घेता घरात काम करत असते, तरी तिच्या कामाची कधी मोल धरले जात नाही.👩‍🍼👩‍🍼
" फरक नाही पडत मला की दुनिया काय म्हणते,
"तु खूप छान आहेस..!" असे जेव्हा माझी आई  मला म्हणते..!"
लहानपणीचे  ते आपल्या आईचे बोल आठवतात मला,
जेव्हा केव्हा मला हाता किंवा पायाला जखम व्हायची त्यावर आई हलकीशी फुंकर  मारत म्हणायची "बस्स...!! आत्ता होऊन जाईल चांगलं."
मित्रहो खरं सांगू,आज वर तशी औषधे कुठेचं नाही मिळाली.
कधी जीवनात खूप वाईट होऊन जाते, तरी देखील ती चांगले म्हणते, आपला विद्रूप दिसणारा किंवा कुरूप दिसणारा मुलगा, मुलगी देखील ती आई दुधाने धुतलेला मानते,
" सबसे सिधा साधा भोला भाला में ही सबसे सच्चा हुं l
कितना भी हो जाऊ बडा में माँ, अभी भी मे तेरा लाडला बच्चा हूं l"
त्या आईने आपल्यला नऊ महिने पोटात तर तीन वर्षे हाताचा पाळणा करून वाढवले आणि आपल्या हृदयात जागा दिली.
कधी कधी असे होते की वेळ निघून जाते, आणि पश्चाताप होऊन राहतो फक्त, आणि ती व्यक्ती या दुनियेत नसते.
" दिवसभर मेहनत केल्यानंतर घरी आल्यावर आपले मित्र आपणास विचारतात की दिवसभराचे किती कमावतो...? पत्नी विचारते की दिवसभरच्या कमाईतून किती वाचवले...? तर कधी मुलगा विचारतो की पप्पा माझ्यासाठी काय काय आणले...? परंतु आई एकमेव अशी व्यक्ती आहे की ती विचारते बेटा जेवण केलस...? "😥
" आईच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तेव्हा  मी तिला विचारले, आई...! आई..!ए..आई..!! बोल ना गं....! कधीपर्यंत असे तू मला तुझ्या खांद्यावर डोके ठेवू देशील, तेव्हा आईने मला सुंदर असे उत्तर दिले, बेटा जो पर्यंत बाकीचे मला खांद्यावर घेत नाही तो पर्यंत...!!"😭😭😭😭😭😢
मित्रहो, शेवटी एकचं सांगेन ते फक्त  हे👇
" आईने जे पण बनवले ते बिना नखरे करता खाऊन घ्या, कारण की ह्या जीवनात असे काही लोक आहेत की त्यांच्याजवळ....... एकतर जेवण तरी नसते,
आणि दुसरे म्हणजे......  एकतर आई तरी नसते...!!!"


Rupali borse. की अन्य किताबें

किताब पढ़िए

लेख पढ़िए