खरंच आम्ही वांझ आहोत*
( सिन 1 स्क्रिन प्ल्ये - मित्र गेट उघडून बंगल्यात प्रवेश सुधाकर एका रेस्ट खुर्चीवर बसून त्यांचं लक्ष पुढील रामभाऊ च्या घराकडे असते मित्र म्हणतो )
सिन 2
1 --- नमस्कर *सुधाकर*,
2---अरे शंकर ये.... ये....
1----फार दिवस झाले कुठं गप्प होता ...
2---- मी इथे नव्हतो.
परदेशाला गेलो होतो. मुलांकड
1------म्हणजे .--कॅनडाला?
2---- होय एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.
1---अरे . मग एवढ नाराज होऊन का सांगतोय मस्तच सेटल झालेत कि.... मग ?
2----( चिडून ) काय.........सेटल........
काय उपयोग हाय यांचा * बग.. ब... ग माझ्याकड माझ्या घराकड....
आज आम्ही घरात दोघेच आहोत.
सिन 3------
( स्क्रीन प्ले बंगल्याचा लुक )
2----- अरे वय झालय आत्ता आम्हा दोघांचं .... आणि त्यात तीच सततचं दु:खणं...... दवाखान्यात न्यायला कुणी सोबतीला पण नस्त अरे.....साधी चा ची पावडर कुणी आणायची हा प्रश्न असतो आमचा..
सिन 3👍
(स्क्रीन प्ले 2----खुडचीवरून उठतात लक्ष रामाच्या घराकडे काही हालचाल )*
2----तो शेजारचा राम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे*. दोन मुलं, एक मुली, नातवंडं... नुसता घरात गोंधळ असतो गोंध....ळ .
1--- कसला गोंधळ
2-----म्हणजे रामाचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, काय नशीब त्याच
*साधा खोकला आला तर सगळेजण रामाला घेऊन दवाखान्यात जातात , डॉक्टरनसी चौकसी करतात . आ... नी...आमच्या मुलांचा साघा कसे आहात म्हणून फोन सुद्धा येत नाही
1---असुदे कामात असतील.. चल फिरून येऊ
Sin 4
2-----( रडका आवाज आणि चेहरा भाहेर चालत फिरत असतात रोड वरून )
आणि....हा आमचा मो...ठा बंगला,
लाखभर पेन्शन, अलिशान गाडी......., पण साधं घराची बेल वाजते तर दार उघडायला कोण नसत.माझ्या ...
1-----अरे मग काय उपयोग आहे मूल शिकवून मोठी करण्याचा
दोघ मुलांकड राहिला का जात नाही.
2--- काय उपयोग नाही मित्रा... तिथे पण अशीच परिस्थिती आहे ति दोघेही नोकरी ला...
1-----दुसर कोणी नाही काय घरात म्हणजे नातू
2--- 5 वर्ष झालीत लग्नाला दोघांच्या नुसतं नोकरीं काम बस.... आम्हला पण वाटतय नातवासी खेळायला फिरला आधी मधी रामाची बायको
नातवाला घेवून येते घरी सवंती कडे बघून माझी मलाच वाईट वाटते तिच मन किती झुरत असेल
Sin--5
1---बोलावून घायचं लेकरांना
2--हु श्रीमंतीचा गर्व होताना थोडं दाबकतात
परवा रामच्या मुलांनं हिला दवाखान्यात नेलं अन आणलं*. दोन दिवस रामच्या सुनाने स्वयंपांक करुन दिला.
आणि आणि.....आमची मूल?? *( डोळे पाणवलेले ) कधी कधी वाटत
काय मिळवलं मि मुलांना ऊच शिक्षण देऊन... फक्त एकटे पणा..एवढं सगळं मिळवलं कुणासाठी👆
1--- करतील मुलपण तुझ्यासाठी
2------काय करतील मला घर दे तू ते घे बस अरे
मुलांना येवडा पगार माझी येवडी संपत्ती त्यांना त्यांना फार त्रास घ्याची काय ग्रज आहे....*माझ्या एका मुलाला 20 लाखांच पॅकेज, आणि दुसऱ्याला 25.. आणि मला 30 हजार पेन्शन तरी पण सुख नाही..
*त्या रामाचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच*. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.
*आता कोण सुखी तुच सांगा मित्रा .*
तो राम का मी.... ए.क्स....सर्वन्ट
माझ्यांकडे कुत्रं नाही.
आता बोल *आम्ही वांझ नाही तर काय आहोत.*
1---हो खरं हाय
2-----हो काय परवा मोठ्यां मुलांला हि बोलली एकदा ये महिनाभरासाठी तर तो म्हणाला महिनाभरासाठी? *मला एक तासाचा वेळ नाही.*
चीडून हि म्हणाली, मेल्यावर तरी येणार कां? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला.
सांगा मित्रा *आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत.*
मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यांवर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. बापांचा खरा आधार मुलंच असतात .* रामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण रामा इतका सुखी कुणी नाही.
आम्ही मुलांना डिग्री केली आणि आम्ही वांझोटे राहिलो ......वांझोटे ?
*मुलं म्हणतात आम्हांला तुमचं घर नको शेती नको* .............
*आणि आणि तु....म्ही ही न ..को..त.*
*मित्राचे डोळे भरून आले*. शंकरलाही नाही आवरले.
*सुधाकर एकदम कठोर झाला म्हणाले.....*
मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारा संसार रामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार.
*बास........बाकी काही नको.👆