shabd-logo

देह..

2 अक्टूबर 2022

16 बार देखा गया 16

पेटव हा देह माझा

नको हा खेळ आता

ह्या देहयाची नश्वरता केव्हाच झाली

आता उरला फक्त आगीचा डोह

पेटव हा देह माझा।।

 

दिवसाची सुरुवात झाली होती आज नवीन काय बघायला मिळणार नवीन काय ऐकायला मिळणार हाच विचार करत मी चालली होती एवढ्यात समोर टॅक्सी उभी दिसली म्हणून टॅक्सी पकडली आणि ड्राइवरला कुठे जायचं आहे ते सांगितलं.माझं कामच अस होत की तिथे मला रोज काही ना काही नवीन बघायला मिळायचं पण हे नवीन मनाला आनंद देणार नव्हतं तर माणुसकी किती खालच्या थराला गेली आहे ह्याच रोज दर्शन व्हायचं आणि त्यातूनच मी शिकत होते अनुभव घेत होते आणि कधी-कधी चुकत ही होते....

 

N. G. O मध्ये पोहचल्यावर समजलं आजचा टास्क काय आहे.रेड लाईट एरियामध्ये जाऊन तिथल्या स्त्रियांना ऑनलाईन बँकिंग कसे करायचे ,ऑनलाईन पेमेंट कसा करायचा म्हणजे थोडक्यात त्यांना इंटरनेटचे ज्ञान द्यायचे होते आमची एक टीम नेमून दिली प्रत्येक टीम मध्ये पाचजण निवडून दिले होते.थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आम्ही आमच्या कामाला निघालो.रेड लाईट एरियात बऱ्याचवेळा मला N. G. O कडून कामानिमित्त जावं लागायचं त्यामुळे तिथल्या बायकांचे आयुष्य त्यांचा संघर्ष खूप जवळून मी बघितला होता त्यामुळे त्यांचे आयुष्य बघून मन खूप उदास व्हायचे त्यामुळे मी देवाचे आभार मानायची की मला अश्या बायकांची मदत करता येत होती...

 

काही वेळातच आमची टीम रेड लाईट एरियात पोहचली बऱ्याचवेळा कामानिमित्त आम्हाला त्या एरियात जावं लागायचं त्यामुळे बऱ्याचश्या बायका त्यांची मुलं आमच्या ओळखीची  झाली होती आम्ही गेल्यावर त्यांची मुलं आमच्याभोवती गोळा व्हायची कोणी दीदी बोलायच तर कोणी ताई बोलायच आणि आम्हीपण त्या छोट्या मुलांशी प्रेमाने आपुलकीने वागत होतो जेव्हा पण आम्ही इथे यायचो तेव्हा त्या मुलांसाठी खाऊ ,खेळणी ,शाळेचे सामान असे काहींना काही नेत असू त्यामुळे मुलं ही खुश व्हायची....

 

काय आयुष्य आहे ना ह्या देह विक्री करणाऱ्या बायकांचे रोज त्यांची स्पर्धा चालू असते गिऱ्हाईक स्वताकडे आकर्षून घेण्यासाठी ह्या बायकांच्या मुलांसाठी काही सरकारी सवलती तर आहेत पण त्या सवलती कितपत त्यांच्यापर्यंत पोहचतात हा एक प्रश्नच आहे?? सगळ्यात जास्त फरफड तर त्या बायकांची होते ज्यांचे वय झाले आहे ज्या म्हाताऱ्या झाल्या आहेत ज्यांचे तारुण्य संपले आहे अश्या बायकांची हालत खूप खराब असते. ह्या देह विक्री करणाऱ्या बायकांशी बोलताना बऱ्याचवेळा असे जाणवायचे की त्या चिडून त्रासून उद्धट बोलायच्या म्हणजे हा अनुभव आम्हाला सुरुवातीला यायचा पण आता N. G. O. मार्फत आम्ही कामं करतो हे त्या बायकांना समजले होते  त्यामुळे आता त्या व्यवस्थित बोलतात पण जेव्हा त्या त्रासून चिडून बोलायच्या तेव्हा आम्हाला समजायचं नाही की ह्या अश्या का बोलतात पण नंतर माझ्या लक्षात आले की त्या बिचाऱ्या बायकांची मनं मरून गेली आहेत.भावना पुर्णपणे शून्य झालेल्या आहेत....

 

देहविक्री!!! इतक्या सुंदर देहाची निसर्गाने निर्मित केली आणि त्याच देहाची पैशाची बोली लावुन विक्री करावी लागते ह्या पेक्षा अपमानित आयुष्य काय असेल ह्या पेक्षा मोठं दुःख काय असेल . मरणापेक्षाही भयंकर यातना या देहाला रोज भोगाव्या लागतात मनाविरुद्ध स्वताचा देह दुसऱ्याच्या स्वाधीन करावा लागतो त्यात समसजाकडून मिळणारी हीन वागणूक .

 
रोज ओरबडला जाणारा देह आता नकोसा वाटतो 

      देह आणि आत्मा इथे रोजच मरतो 

      तरीपण जगण्याची एक आशा शोधतो

                  हा देह माझा रोजच पेटतो  ।।           

 

          तिस जणींचा ग्रुप तयार करून आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली online पेमेंट नेट बँकिंग कसे करायचे ह्याचे शिक्षण त्या बायकांना देत होतो शिकवता-शिकवता काही वेळ निघून गेला आणि माझी नजर तिच्यावर गेली तिच्या चेहऱ्यावर तेज होते उत्साह होता आम्ही जे शिकवत होतो ते ती अगदी मन लावून ऐकत होती . एकतास उलटून गेला आम्हीपण आमचे शिकवणे थांबवले कारण थोड्यावेळ रेस्ट घेऊन आम्हाला अजून पुढच्या तीस जणींना शिकवायचे होते. आम्ही बसून बोलतच होतो एवढ्यात ती माझ्याजवळ आली मला म्हणाली ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता मला आधीपासून नेट बँकिंगबद्दल थोडेफार माहीती होते पण आज तुमच्यामुळे पूर्ण माहिती मिळाली.तिचे बोलणे ऐकून मी तिला विचारले तुझे शिक्षण किती झाले आहे त्यावर ती म्हणाली बारावी पर्यंत शिकली  पण पुढे शिकायला नाही मिळाले इच्छा होती शिकायची पण माझ्या नशिबी शिक्षण नव्हते.मी न विचारता तिने स्वताचे नाव ही सांगितले मला म्हणाली माझे नाव वर्षा आहे ती पुढे काही सांगणार एवढ्यात आमच्या टीमपैकी एकीने आवाज दिला पुढच्या तीस जणींना शिकवूया त्यामुळे तिच्याशी बोलणे अर्धवटच राहिले.

 

संध्याकाळ चे पाच वाजले होते आम्ही सगळेजण आमच्या N. G. O. च्या ऑफिसमध्ये जायला निघालो तिथून निघताना मनात एक उदासीनता होती डोक्यात वेगवेगळे विचार होते आणि अचानक मला वर्षा आठवली. तिचे बोलणे आठवले तिने सांगितले होते की तिचे शिक्षण बारावी पर्यंत झाले होते पण इच्छा असूनही पुढे शिकता नाही आले पण तिचे बोलणे ऐकताना मला तिचा आवाज थोडा पुरुषी वाटला आणि तिची देहयष्टी पण थोडी पुरुषीच होती .पण मग नक्की खरे काय होते मला तिच्याबद्दल असे का जाणवले वर्षा नक्की कोण होती तिच्या बद्दल आठवून डोक्यात अजूनच विचारांचं काहूर माजलं समोर वेगवेगळे प्रश्न उभे राहिले.शेवटी मी ठरवले उद्या तिकडे गेल्यावर आधी वर्षाला भेटायचे....

 

दुसऱ्या दिवशी पुन्हा आमच्या N. G. O. ची टीम रेड लाईट एरियात पोहचली तिथे गेल्या-गेल्या मी वर्षाला शोधू लागली पण वर्षा काही भेटेना म्हणून मग मी तिच्या सोबत ज्या काल बायकांना बघितलं होतं त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या आम्हीपण सकाळपासून तिला बघितलं नाही त्यामुळे आम्हालापण माहिती नाही ती कुठे आहे.माझी हुरहूर अधिकच वाढली कुठे असेल वर्षा काय झालं असेल मला तिच्याशी बोलायचं होतं तिच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं होतं पण तिचा काहीच पत्ता नाही.हळू हळू आमच्या कामाला सुरुवात झालीआणि बघता-बघता  एक तास होऊन गेला पण वर्षा काही दिसेना थोड्यावेळाने मी तिची चौकशी अजून इतर बायकांकडे केली पण कोणाला काहीच माहिती नाही.दिवस संपत आला आमचे काम पण आता फक्त उद्याच्या दिवसच इकडे होते म्हणजे माझ्याकडे फक्त उद्याचा दिवसच होता वर्षाला भेटायचा.संध्याकाळ झाली आम्ही जायला निघणार होतो पण माझी नजर वर्षाला शोधत होती शेवटी न राहून मी त्या बायकांच्या एक-एक खोलीमध्ये जाऊन बघायला सुरुवात केली जेणेकरून वर्षा कुठेतरी दिसेल पण माझा प्रयत्न असफल झाला मी निराश होऊन जायला निघणार एवढ्यात पाठमागून कोणीतरी आवाज दिला....

 

पाठी वळून बघितले तर पंधरा -सोळा वर्षांची एक मुलगी उभी होती तिने मला मानेच्या खुणेने स्वताजवळ बोलावलं मला म्हणाली तुम्ही वर्षा ताईला शोधताय ना मी म्हटलं हो!! तुला माहिती आहे का वर्षा कुठे आहे त्यावर तिने हाताने मला एका खोलीच्या दरवाज्याकडे खून करून दाखवली मी तिच्या डोक्यावर हात ठेवून thanku म्हणाले आणि तिने दाखवलेल्या खोलीकडे गेले खोलीचा दरवाजा अर्धवट उघडाच होता मी हळूच दरवाजा ढकलला आणि आत डोकावले तर वर्षा बेडवर झोपली होती खोलीत अंधुकसा प्रकाश होता.मी हळुच तिच्या जवळ जाऊन तिला हाक मारली माझा आवाज ऐकल्यावर तिने माझ्याकडे वळून बघितले आणि अचानक दचकली आणि उठून बसली तिच्या चेहऱ्यावर मानेवर हातावर पटयांचे वळ उठले होते तिचा चेहरा सुजला होता तिची हालत बघून मला काय समजायचे मी समजून गेले...

article-image


1
रचनाएँ
देह
0.0
देह व्यवसाय करणाऱ्या स्त्री,पुरुष संघर्ष

किताब पढ़िए

लेख पढ़िए