shabd-logo

रक्षाबंधन

22 जनवरी 2023

12 बार देखा गया 12
दिवस उगवला की रिसोड शहरातील महाविद्यालयात आवश्यक जा लागत होते. मी बी.ए वर्गात शिकत होतो. माझी परीस्थिती थोडिशी गरिबीची होती. म्हणून मी यथाशक्ति होऊ शकेल तस महाविद्यालयात येत होतो. तवा मी महाविद्यालयात एका तरुणीला पाहील, ती मृगनैनी ज्या महाविद्यालयात शिकत होती, मी पण तिथच शिकत होतो. पण दोघांची ओळख, सहवास यास बराच उशीर लागला. ज्या दिवशी मी त्या तरुणीला पाहील होत, तवा तर माझ्या अंतःकरणातील ह्रदयास्पद माधुर्य जे माझ्या "माँ सीता" प्रति आहे, ती प्रेमाची अमृतधारा माझ्या मनात उतरत होती. ती सरोजवदना माँ सीता मला त्या तरुणित दिसत होती. मनुष्याच्या जीवनात कमीत कमी एक ठिकाण असे असलेच पाहिजे, ज्याच्यासाठी मनुष्याला आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे शक्य झाले पाहिजे. तिच्याकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन प्रेमपुरक होता. म्हणून मी ठाम पणे ठरवले होते की मी तिला माझी कायमस्वरूपी बहीण बनवणार. खरच परमात्माची अमुल्य भेट असते बहीण. जो आपल्या स्त्रीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्त्रीबाबत पत्नी भाव ठेवत नाही, त्याला यति पुरुष म्हटले जाते. परस्त्रीला तिच्या वयानुसार आई, बहीण किंवा कन्येच्या भावनाने पाहावे. जरी तिच नश्वर शरीर माझ्यासाठी पर असेल पण तिच्या अंतरित असणारी माँ सीता पर नवती . करन परमात्मा तर निराकार आहे. पण आपण ज्या स्वरूपात त्याना पाहतो ते त्या स्वरूपात साकार बनतात. किंतु मला त्या सुःकुमारीचे नाव माहित नवते. ज्या वेळी मराठी विषयाचा (वाईवा) होता तवा तिनी तिचे नाव घेतले होते. तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर तिच्याच नावा प्रमाणे तिचा अंतरिचा प्रकाश तिच्या मुखावर दिसत होता. तिचे  नाव रोशनी ताईडे होते. हे श्री राम! तुझा विसर पडेल अशी स्त्री माझ्या जीवनात देऊ नकोस. ज्या स्त्रीमुळ परमात्माची क्षणाक्षणाला आठवण येते, ती स्त्री माझ्या जीवनात दे. ती 'रौशनी ताईडे' एक प्रकारे वरदानच मानावी ज्या कारणाने तिच्यात मला माझी माँ सीता दिसली . रोशनी ताईत "दया,सभ्दावना आणि मानवतावाद हे मोठे पुण्यकारी गुण तिच्यात होते.  सुंदर वस्त्र आणि दागिने हे शरीराची शोभा वाढवतात. हे शरीर नश्वर आहे. एखाद्या कच्चा घड्यासारखे हे शरीर क्षण भंगुर आहे. कोणत्या कारणामुळे हे शरीर नष्ट होईल, याचा काय भोरोसा नाही . इथे माझ्या शरिराचच मला भरोसा नाही, तर मी तिच्या शरीरावर घायल काय होऊ.? मी जानतो की ती वस्तू फक्त दोन दमडिची आहे, तर मी त्याच वस्तूचा ग्राहक कसा बनू? मी प्रेम करतो तुझ्याशी, तर स्पष्ट सागतो ताई तुला,  शरीराशी नवे तर मी तुझ्या अंतरीक असणारी माँ सीताशी मी खूप प्रेम करतो. माझ्या जीवनात तर  नारी ही नर्काचे द्वार आहे. स्त्रियांकडे वासनाच्या द्रुष्टीने पाहिन्यार्यांसाठी. मग तर जशी कोणीही व्यक्ती आहे, तशी एक स्त्री आहे. पण तुम्ही स्त्रीकडे पहा आणि ती व्यक्ती तुमाले दिसत नाही, फक्त तुमाले तिच शरिर दिसते. आणि शरिर मध्ये विषेशतः शरीरात फक्त तिचे जननाग दिसतात, मग नर्क अजुक काय असते .... ? की तुम्ही एक चैतनाला फक्त एक मास बनून टाकले आहे. यालाच तर नर्क म्हणतात. नर्क त्या व्यक्ती मध्ये नाही आहे, की, जिला स्त्री म्हणतात. तर नर्क तुमच्या द्रष्टीकोनात आहे. की, तुम्हाले आपल्या सारखी चेतना तिच्या मध्ये आपण पाहत नाही. तुमाले फक्त तिच्यात हाडमास दिसते. मग हैच तर नर्क आहे ना! हे सत्य जाणून घ्या. ज्याला तुम्ही स्त्री म्हणत आहात , तिचे शरीर ही तिची एकच ओळख नाही , तिच्या इतर अनेक ओळखी आहेत.तुम्हाला तिच्यात दुसरे काही दिसत नाही का? तुमच्यासमोर एक अव्वल महिला खेळाडू येत आहे, कोणतीही ; सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्रा, तुम्ही काय म्हणाल? एक तरुणी येत आहे. असे म्हणाल का? म्हणा हे काहीतरी आहे, आणि असे नाही की ती एक तरुणी नाही. आणि ती व्यक्ती  देखील एक तरुणी स्त्री आहे. पण ते तारुण्य, ते लिंग ही तिची पहिली ओळख नाही. जगाकडे मांसासारखे पाहणे थांबवायचे असेल तर स्वत:कडे मांसासारखे पाहणे थांबवा. 


सौरूप विजय खोटे की अन्य किताबें

किताब पढ़िए

लेख पढ़िए