खूप प्रेम करते आपल्या लेकरांवर
तिची सर नाही होणार जगभर...
उपकार नाही फिटणार तिचे कणभर
असा जिव्हाळा माय-लेकांचा एकमेकांवर....॥१॥
जरी नसत तिच्याशी काहीच काम
घरी आल्यावर पहिल निघत तिच च नाव...
जरी काही बोलायच नसत आईशी
तिला बघितल्यावर आनंद मिळतो या मनाशी...॥२॥
आई म्हणजे सर्वस्व आहे
तिच्याविना सर्वकाही व्यर्थ आहे...
नाही कळणार आईची ही भोळी माया...
सर्व काही उन्हाळ होईल,
जर डोक्यावर नसली तिची छाया....॥३॥
न दाखवता ती खूप प्रेम करते आपल्यावर
तिच्या एवढ प्रेम नाही मिळणार जगभर...
जरी नसली ती शिकलेली फार...
आपल्या लेकरांनी खूप शिकाव ...
बस्स इतक्याच असतात तिच्या अपेक्षा फार...॥४॥
मला जन्म दिलाय जिच्या पोटी
देवा तुझे खूप खूप आभार...
या जन्मीच मला प्रेमळ "आई" दिली...
म्हणुन पुढच्या जन्माच काहीच नाही मागणार...॥५॥