घरून भरकटून आलेली पाखरे...
का कुणाची काळजी घेतात..
जणू हीच ताकत आहे का???
मैत्री या नात्यात....॥१॥
का लोक म्हणत असतील ...
की कुणीच कुणाच नसतं....
या स्वार्थी जगातील...
हे नातं रक्तापलीकडचं असतं...॥२॥
आधी अनोळखी असणारे...
नंतर एकमेकांना समजून घेतात...
जणू हीच ताकत असते का???
मैत्री या नात्यात....॥३॥
मोकाट शिव्या देणारे ते
घरच्यांसमोर सभ्य बनून राहतात...
कधी काही राडा झाल्यावर
आपल्या अगोदर मैदानात दिसतात...॥४॥
ʼमीʼ पणा चा त्याग करतं
एकमेकांवर हक्क गाजवतात...
जणू हेच प्रेम असतं का???
मैत्री या नात्यात....॥५॥