भाग :- 1
(आज च्या विषयावर एक भुत कथा लिहन्याचा विचार आहे. आवडल्यास कमेंट करुन सांगा )
सुरेश एक तरुन युवक नेहमी हसत खेळत राहनारा मुलगा अचानक शांत राहु लागला. नेहमी शुन्यात पाहत असे. प्रेम की टेन्शन? किंवा दुसरे काही?
सुरेश आज रात्री एका कुशी वरुन दुसऱ्या कुशी वर करत रात्र संपन्याची वाट पाहत होता. कारण आज पोर्निमा असल्याने तो संगिता ला भेटु शकत नव्हता. नेहमी प्रमाने रात्री उशीरा न येता मुलगा लवकर आल्यामुळे घरचे आंनदात होते. पुरोनपोळी चा स्वयंपाक आवडीचा असल्याने आईने त्याला जबरीने खाउ घातले. पन तो उदास मनाने जेवत होता. आज संगिता ची भेट झाली नव्हती . पन उद्या तर ती भेटेलच या एक मात्र आशे वर तो अंथरनावर लोळु लागला.
संगिता त्याला कशी भेटली हे विचार त्याच्या मनात सुरु होते. दोन महीन्या अगोदर ची घटना अगदी काल घडल्या सारखी वाटत होती. तो अपल्या मित्रा सोबत पार्टी करून घरी येत होता. त्याच्या कॉलोनी जवळ एक जुने बंद पडलेले इस्पीतळ ( दवाखाना) होते. दोनों मजली इमारत मोडकळीस आली होती. जागो जागी गवत वेली वाढल्या होत्या. येता-जाता नेहमी त्याला त्या इमारतीला आतुन पाहयचा मोह व्हायचा, पन तो थोडा भित्रट असल्याने तो टाळत होता. त्या रात्री त्याला थोड़ा उशीर झाला होता. आकाश अंधारून आले होते. पाउस कधीही येवु शकतो असे वातावरण बनले असल्याने तो भराभर पावले उचलत जात होता, अचानक त्याला ती दिसली.
उंच, शिडशीडीत मोठे डोळे त्यात हलका काजळ, रुदन कपाळावर, साधारण चेहर्यावर हलकी लिपिस्टिक नर्स च्या कपड्यात ती लगबगीने एका रुम मध्ये जातांना दिसली.
सुरेश ला आश्चर्य वाटले, काय प्रकार आहे पाहन्या करीता तो तिच्या मागोमाग आत शिरला . बाहेरुन पडझड झाली तरी आतुन दवाखाना योग्य स्थितीत होता. आत एका बेडवर एक म्हातारी झोपलेली दिसली नर्स ने तीचे सलाईन काढुन घेतले व ती पुन्हा बाहेर आली.
संगिता :- "बोला, काय काम आहे? पेशंट ला भेटन्याची वेळ 1 ते 4 आहे. झोपयचे असल्यास बाहेरच्या आवारात जा! ( सुरेश कडे पाहत ती) हा लेडीज वार्ड आहे ; पुरुष नाही थांबु शकत."
तो तर फक्त तीला बोलताना पाहत होता. अचानक तो कशाला तरी धडपडला , डोके भिंतीवर आपटले थोड रक्त आले. तिने पट्टी केली ; एक इंजेक्शन 💉 टोचत बोलली " दिसत नाही का? " त्या ने हसत हळुच डोळे बंद केले.
जेव्हा जाग आली तर तो जीर्ण झालेल्या इमारतीच्या एका धुळ भरलेल्या खोलीत लोळत पडलेला होता. सुर्य वर आला असल्याने खुप सारा प्रकाश चोहुकडे पोहचला होता. पुर्ण बिल्डिंग शोधली पण कुठेच नर्स, डॉक्टर किंवा पेशंट नव्हते. तो सरळ घरी आला अंघोळ वगैरे करुन कामावर जायला निघाला , बिल्डिंग समोरचा रस्ता शॉटकट असल्याने तो नेहमी तिकडुनच जात असे. जातांना त्याने ऐकवेळ पुन्हा नजर टाकली पन व्यर्थ.
दिवस भराचे काम आटपुन तो सिगरेट औढत घराकडे येउ लागला. दवाखाना जसा जवळ येत होता तशी सुरेश ची चलबिचल होउ लागली . दवाखान्यांमधून हलका उजेड पडु लागला बिल्डिंग च्या आवारात एक अँम्बुलैन्स ऊभी होती. तो चटकन आत गेला, संगिता टेबलामागे पेंगत होती. पावलाच्या आवाजाने तीची झोप मोडली.
लटक्या रागात, " कुठे गेला होता? मला सांगुन तर जायचे! ही औषधी घ्या!"
काही बोलन्या अगोदर तिने दोन गोळ्या हातावर टेकविल्या, एका हातात पाण्याचा ग्लास घेउन ती उभी होती.
सुरेश ने पटकन दोन्ही गोळ्या तोंडात टाकल्या पानी पिवुन तो टेबलावर बसला. काही समजन्या अगोदरच संगिता त्याच्या डोळ्यात पाहु लागली. तिचे मांसल भाग उठुन दिया लागले. काही कळन्या अगोदरच सुरेश आपले कपडे शरिरा पासुन अलग करु लागला. आता दोघे सुध्दा कपड़्या विना होते ; दोन जिव आपली भुक भागविन्या साठी कठोर परिश्रम करु लागले. त्यांची वासना शांत झाली तशी सुरेश चे डोळे बंद होउ लागले, तो काही तरी विचारनार होतो पन तो झोपी गेला.
सकाळी तो पुन्हा औसाड धुळीने माखलेल्या खोलीत होता. तो विचार करित होता आज त्याने प्रत्येक रुम चेक केली पन चहुकडे तेच धुळ , उंदीर घुशी ची विष्टा कुठे कुठे लोंबकळनारे वटवाघुळे. त्याच्या खांद्यावर कुनी तरी हाथ ठेवला.सुरेश चे पाय लटपटु लागले कपाळावर घाम जमु लागला. भितीची शितलहर सर्वांगात घुसली होती.......!
( मित्रांनो कथा आवडल्यास रेटीग देउन कंमेट करा . बाकी पुढील भागात)