shabd-logo

यालाच देशप्रेम म्हणतात का?

25 जनवरी 2020

389 बार देखा गया 389
featured image

आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर धर्मनिरपेक्ष देशात आपण स्वतःची दयनीय अवस्था करून घेत आहोत व देशाचीही. उच्चशिक्षित तथाकथित भारतीय तरुण( तथाकथित यासाठी म्हणत आहे की त्याच्या कृतीतून विचारातून राष्ट्रभक्ती मुळीच दिसत नाही)कदाचित प्रसिद्धीसाठी काहीही विचार न करता सोशल मीडियावर ट्विट करतो. आपले मत मांडतो आणि ते वणव्यासारखे भारत भर पसरते. मग समाजातुन त्याला विरोध -पाठिंबा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या येतो आणि बिनबुडाच्या सामाजिक न्यायासाठी तो बुद्धिवादी तरूण राष्ट्रप्रेम ,राष्ट्र हिताची कत्तल करीत बसतो.आज अनेक ज्वलंत प्रश्न देशासमोर, समाजासमोर इथल्या तरुण पिढी समोर उभी आहेत. एक जबाबदार सुजाण सुसंस्कृत नागरिक म्हणून मी देशाच्या हितासाठी काय करतोय? आज रस्त्यावरून जाताना खचकन थुंकतो ,"चील" मारण्यासाठी करीत असलेल्या पार्ट्या. त्या पार्ट्यां च्या दारूच्या बाटल्या सकाळी काळ्या पिशवीत घालून पांढरे शुभ्र कपडे परिधान करून भरदिवसा एटीत रस्त्यावर फेकतो. "थ्रील" अनुभवण्यासाठी बलात्कार ,हिंसा, अत्याचार करतो. अशांती पसरवतो. सामान्य नागरिकांना फसवतो.हिरोपंती दाखवण्यासाठी रस्त्यावर जोर जोरात राष्ट्रविरोधी घोषणा देतो. निसर्गाची मान हानी करतो. राष्ट्रीय साधन संपत्ती ला आग लावतो तोडफोड करतो. आपले विचार- मत मांडण्यासाठी राष्ट्रगीत राष्ट्रभाषा, राष्ट्र संपत्ती यांचा जराही आदर करत नाही. याला भारतीय तरूण म्हणता येईल का ?यालाच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करणे म्हणता येईल का? निवड प्रसिद्धीसाठी , राजकीय हितासाठी , अर्थ प्राप्तीसाठी वा तथा मुल्यहीन क्षणिक गोष्टींसाठी सामाजिक शांततेचा भंग करत स्वतःला देशभक्त समजत ,जाती व धर्मावरून स्वतःला स्वतःहून वेगळे मानुन, आम्ही अत्याचार सहन करीत आहोत , दीनदुबळे आहोत हे नुसते दाखवत इतरांना फसवत व स्वतः फसीत , बिनबुडाचे भाकीत करत देशद्रोह करण्यापेक्षा रस्त्यावरील व मनातील कचरा साफ क रणे कधीही श्रेष्ठ.

मुळात जाऊन जर संशोधन केले असे लक्षात येते की बऱ्याच दा कुठलेही चांगली व वाईट घटना घडली की त्याबद्दल प्रतिक्रिया लगेच नोंदवल्या जातात. वाईट घटनेचा निषेध व्यक्त केला जातो. पण निषेधाचा प्रकार व पद्धत ही घटनेतील सहभागी व्यक्तींच्या व पीडितांच्या जाती-धर्मा नुसार बदलते. यातच युवा तरुण पिढी विचार मीमांसा न करता अगदी सहजरीत्या गुरफटून जाते.मग निरपेक्षता जपली जाणार कुठून. हे खूप मो ठी शोकांतिका आहे. आपण देशाचे नागरिक आहोत.देशासमोर अनेक कमी-अधिक प्रमाणात सामाजिक नैसर्गिक आपत्ती आहेत. भविष्यात अशा बऱ्याच आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे. मग असे असताना युवा तरुण पिढीने निश्चितच विचार करायला हवा की आपली ही ज्वलंत विचार व शक्ती कुठे कशी आणि कोणत्या गोष्टीसाठी खर्ची केली पाहिजे .व्यक्ती व समूह हितापेक्षा राष्ट्र हित जपणे कधीही फायदेशीर. कारण आज आपला देश अशा अनेक छोट्या मोठ्या घटकांचा महा "राष्ट्र "आहे. त्याची महानता आपल्याला टिकवून ठेवायची आहे.माझे ते आद्य कर्तव्य आहे. तरुण म्हणून माझी वैयक्तिक कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी आहे. इथे मी माझ्या हक्कासाठी लढताना मागणी करताना समाजातील कोणत्याही दुसऱ्या घटकाला दुखावणार नाही. राष्ट्रगीता चा मान राखेल, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणार नाही असा प्रण प्रत्येक युवकाने घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याचा गैरवापर करणे म्हणजे गुन्हा होय आणि हेच आपली तरुण पिढी करत आहे. राष्ट्राला सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करील, प्रत्येक सण सोहळे आनंदाने साजरी करेल .भारतीय संस्कृती व परंपरेचा पाईप होईल अशी प्रतिज्ञा खरतर अगदी लहानपणापासूनच आपण म्हणत असतो.पण *"सुशिक्षित तरुण" होत असताना तिचा विसर पडतो. आपल्या महान संस्कृती व इतिहासाने दिलेली "वसुधंम कुटुंबम" ही शिकवण आपण शेवटच्या श्वासापर्यंत जपली पाहिजे. *"भारतीय" हीच माझी "जात", माणुसकी हाच माझा "धर्म"व "राष्ट्रसेवा" हेच माझे "कर्म"*.असे क्षण क्षण जगताना मी माझ्या देश हिताचा विचार करीत आणि कणकण या देशाला अर्पण केला पाहिजे. थोर महात्म्यांच्या बलिदानाची परंपरा माझ्या सळसळत्या रक्तात व नसानसात मी स्वतः कोरेल. माझ्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून देईल.असे सर्वांनी मिळून जपले आणि जोपासले पाहिजे.

खरंतर या तथकथित देशभक्त तरुणांना(देशद्रह्यांना) प्रथम प्रसिद्धी देणे थांबवले पाहिजे .आपल्या घरातील तरुण पिढीला देशभक्तीचे बाळकडू समजावून सांगितले पाहिजे. चांगल्या गोष्टींचा पुरस्कार, वाईट गोष्टींचा तीव्र निषेध व योग्य ती कारवाई या सर्व गोष्टींमुळे हे सर्व थांबेल असे नाही. सामान्य नागरिकाने "भारतीय" म्हणून कोणत्याही घटनेबद्दल मत मांडताना आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरून व कुठून तरी ऐकल्या वरून कुणी काहीतरी करतोय म्हणून पेपरात फोटो येण्यासाठी ,श्रेष्ठी कडून वाहवाह मिळवण्यासाठी , काळ्या पैश्यासाठी ,मी किती अपडेट आहे हे दाखण्यासाठी कोणतेही काम करताना माझ्या कुटुंबातील पिढीसाठी मी काय पेरून जात आहे याचा विचार केला पाहिजे कदाचित तुम्ही करत असलेल्या कृत्याला तुम्ही देशसेवा म्हणत असाल पण या देशद्रोही कृत्यासाठी तुमच्या सात पिढीही तुम्हाला माफ करणार नाही म्हणून एक माणूस म्हणून विचार करा करायचे काय.. ठरवायचं तुम्हालाच..आणि पाळायचं तुम्हालाच...! जय हिंद जय भारत

Purva Gulab Jadhav की अन्य किताबें

किताब पढ़िए

लेख पढ़िए