माध्यम
लेखक :- श्री. परेश पडोळकर
आज घरातील छोटा शुभम सोडून बाकीच्या सर्वांनाखुप आनंद होत होता त्याचे कारण ही तसेच होते. आज घरातील छोटा शुभम पहिल्यांदाच शाळेत जाणार होता. शाळेत जाण्यासाठीच दोन दिवसांआधी पप्पांनी त्याला आपल्या सोबत मार्केटमध्ये मोठ्या खुशीमध्ये नेले होते. त्याला वाटले पप्पा आपल्याला खेळणे घेवून देणार आहेत. पण पप्पांनी त्याला ज्या गोष्टींमध्ये काहीच समजत नव्हते त्या वस्तु जसे की, पेन, नोटबुक, कपडे इ. त्याला विचारुन पसंतीने घेत होते.
शुभमला शाळेत पाठविण्यामांगचे कारणही तसेच होते एक वर्षाआधी ज्याच्या खोडकर पणाला ''किती बदमाश आहे हा'' असे आईवडील कौतुकाने म्हणायचे तोच शुभम आज त्यांच्यासाठी टेंशनच कारण बनला होता कारण आता त्याला प्रत्येक गोष्ट काय आहे हे सांगुन न समजता ते त्याला करुन पाहिल्यानंतर समजत होते व त्यामुळेच ''याला एकट्याला किंवा माझ्यासोबत मी ठेवूच शकत नाही हा कधी काय करेल याचा काही नेमच नाही'' अशी त्याच्या आईची धारणा झाली होती. त्यामुळेच तो 3 वर्षाचा झाल्याझाल्याच त्यांच्यासाठी चांगले नाव असणारी कडक शिस्त असणारी शहरातील सर्वांत नामंकित L.S.M. इंग्शिल स्कुल या शाळेमध्ये नाव दाखल करण्याचे निश्चित झाले होते. साधारण जि.प. शिक्षक असणा·या त्याच्या वडीलांना ही प्रक्रिया योग्य वाटत नव्हती पण तरीही ''दिवसभर त्याला मला सांभाळावे लागते '' मी काय काय करु ? या पत्नीच्या टोमण्यांमुळे व शेवटी किमान दिवसातचे चार तास तरी घरात शांतता राहील या पत्नीच्या परिपक्व ? विचाराने त्यांनी शुभम चे नाव शाळेत टाकायला परवानगी दिली होती.
शेवटी युध्दाची सर्व तयारी करुन शुभम चे पप्पा प्रशांत सर, त्यांची पत्नी व शुभम शाळेत पोहचले. शाळेत पोहचताक्षणीच शुभम ला शाळेबद्दल ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या कुठच दिसत नव्हत्या. सर्वांना त्याच्यासारखेच कपडे घातलेले होते सगळेच चेहरे नविन दिसत होते आता मात्र शुभमला तिथे भिती वाटायला लागली त्याने पप्पांचा हात आणखी घट्ट पकडून ठेवला. तेवढयात ते शाळेतील एका खालीजवळ ज्याला सर्वजण Office म्हणत होते तिथे पोहचले. (प्रसंग 1 ला )
प्रशांत :- ''सर आत येवू का ? (काही वेळ निशब्द) आं...............! मे आय कम इन सर ...?
प्रिन्सीपल :- ''यस... यस ....... प्लीज कम......'' (तिघेही आत प्रवेश करतात)
प्रिन्सीपल :- So what can I do for you?
प्रशांत :- '' ते काल इथ येवून याची ऍडमिशन केली होती. L.K.G. मध्ये फी पण भरली होती 20,000 रु.
प्रिन्सीपल :- Ok ucan go towards Next Room No. 2 Father Sam will help u
प्रशांत :- ठिक आहे सर
(बाहेर निघताना शुभमची आई हळुच म्हणाली)
नम्रता :- ''इथ सगळे टीचर थेट केरळमधून आणलेले आहेत.''
प्रशांत :- ''काऊन बरं !
नम्रता :- ''त्यांच इंग्रजी खुप चांगले असते म्हणतात.'' ''आणि इथे सर्वांना इंग्रजीतच बोलावे लागते म्हणतात, त्याच्यामुळे आता पुढे इंग्रजीतच बोला चांगल वाटते ? आपला शुभम पहा आता किती लवकर इंग्रजी शिकते ?
(समोरच्या खोलीमध्ये गेल्यानंतर, ते तिथे पावती दाखवतात समोरची व्यक्ती पावती पाहून त्यावरील नंबर लिहून घेतो शुभम चा हात त्याच्या हातात पकडतो व प्रशांत व नम्रताला जायला सांगतो, मम्मी पप्पाला जाताना पाहून शुभमला रडायला येते. पण सुरुवातीला सगळेच रडतात असे स्वत:ला समजावून त्याचे आईवडील त्याला शाळेत सोडून जातात) जाताना शुभमचे वडील म्हणतात.
प्रशांत :- ''फादर सॅम... एक विचारु का राजेहो ? नाई म्हटल तुमी बोलता राजे हो मस्त आमच्या इकडच्या सारखेच .... मस्त हाय !
सॅम:- ''हो की मंग, मी इकडचाच हाव न राजेहो खामगावचा. ''पण इथ आपली भाषा चालत नाई ! सगळ इंग्रजीमंधीच बोला म्हणता ते केरळवाले प्रिसींपल ! पण लोकायले समजत नाई थे म्हणूनचत मले फक्त लोकायशी बोल्याले ठेवलं त्याइन''
प्रशांत :- बर... बर..... येतो मी.
(प्रसंग 2 - शाळेतील वर्ग )
म्ॉडम :- ओ के स्टुडंट लुक अॅट मी अॅन्ड से अलाऊड.
(सगळे मुल घाबरुन म्ॉडमकडे पाहतात.)
रेन... रेन.... गो.... अवे.
म्ॉडम :- '' शुभम .... गो अवे.
शुभम :- अं. आ..... हाव
(थोडया वेळाने)
मॅडम :- प्रशांत I told you say in proper rhymes, nighter i will punish you
(मॅडम प्रशांत ला जोराने छडी मारतात तशा प्रशांत रडू लागतो)
(थोडया वेळाने जेवणाची सुट्टी होते.)
P.T. टिचर :- Run in a queue hands made of all hands and finger on the mouth'' Prasant, dont talk you will be Punished'' (पुन्हा वर्गात)
मॅडम :- Shubham you dont understand anything you made all mistake in you notebook it happened again then I will call you parents in school''
(पुन्हा त्याला शिक्षा होते)
मॅडम :- मनातल्या मनात he is a very badass child in my class
(प्रसंग 3 -प्रशांतचे घर )
मम्मी :- '' अहो ऐकताय का ? उदया आपल्याला प्रशांतच्या शाळेत बोलवलंय ''
पप्पा :- '' अरे वा! छान, पण आपला हवाइमेल कुठाय ?
मम्मी :- ''अहो आताच ट¶ुशनवरुन आला अन चालला होता बाहेर खेळायला होमवर्क किती बाकी होता त्याचा, मी लगेच त्याला अभ्यास करायला बसवले. अभ्यासच करत अशीन तो''
(दोघेही शुभम च्या खोलीत जातात तर शुभम अभ्यास करता करता झोपलेला होता.)
मम्मी :- ''वो.... हाऊस्विट... माझा बाळा अभ्यास करता-करता झोपला. खुप छान''
पप्पा :- ''नाई वं मले वाटते थकलाअशीन तो.''
मम्मी :- '' नाही हो यान असाच अभ्यास केला नं तं आपला पोरगा डॉक्टरच होईल. यात शंका नाही.
पप्पा :- '' थे पावू नंतर अजुन K.G.II लेच तं हाय तो.
(प्रसंग 4 - शुभमचा वर्ग )
प्रशांत :- '' ह.. म्ॉडम आत येवू का ?''
मॅडम :- '' ओ मिस्टर पाटकर ! यसं यस कम इन (दोघेही आत जातात.)
मॅडम:- ''Mister Patkar, Please look at the Shabham is paper he cant writing anything in his paper, he is very pass in eng''
प्रशांत :- ''but mam thats why we take him in your school for studding English''
(म्ॉडम आश्चर्याने त्यांच्याकडे पाहते)
मॅडम :- थोडी चाचरत yes sir we try our best, but he cant do anything and always just traing for playing
शुभम मम्मी :- ''मग आता काय मँडम ?
मॅडम :- you both on the job madam ?
मम्मी :- ''हो मी तहसिलला लिपीक आहे आणि माझे मिस्टर शिक्षक आहेत जि.प.ला ?
म्ॉडम :- O. I See
मम्मी :- ''काय म्ॉडम, थोड मराठीत सांगता काय ?
मॅडम :- ''I think shubham has sattering form learning disability, त्याला शिकतायेत नाही. काहीतरी प्रोब्लेमआहे. I think ''तुम्ही त्याला Special मुलांच्या शाळेत टाकावे.
प्रशांत :- हे काय मॅडम, तुम्हाले त्याले शिकवता येत नाई अन आमाले म्हणता तो CWSN आहे अहो असे कसे होवू शकते. तो जेवणात चांगला आहे, धावण्यात चांगला आहे, खेळण्यात चांगला आहे. त्याच्यासारखी सायकल त्याच्या वयाचे कोणतेच पोर चालवत नाही. चित्र पण खुप चांगले काढतो. अनं. तुम्ही म्हणता तो CWSN आहे काहीतरीच.
(काही क्षणानंतर)
प्रशांत :- मॅडम विचारु का ? How have you learned?
मॅडम :- 12 वी पास आहे मी. आणि सध्या B.A. III Year ला आहे.
मम्मी :- अन ते केरळ वाले ?
म्ॉडम :- प्रिन्सीपल सर तर इंजीनिअर आहेत.
प्रशांत :- '' बरं बरं आल लक्षात म्ॉडम येतो आम्ही.''
(शाळेतून जातात)
प्रशांत :- ''तुझ ऐकुण विनाकारण मी माझ्या मुलाचे सोन्यासारखे लहान वयातचे 3 वर्ष खराब केले. पण आता मी तुझ ऐकणार नाही. पुढच्या आठवड्यात आपण सगळे शिर्डीला जावून आलो की, पुढच पाहतो ''
(प्रसंग 5 - शिर्डीतील दर्शन रांग)
शुभमची मम्मी :- '' किती गर्दी आहे इथे... आणि इथे इतर राज्यातील लोक जास्त दिसत आहेत.'' ही माझ्या समोरची बाई किती छान नेकलेस घातला आहे इन ... विचारतोच इला) (त्यांच्याजवळच एक आंध्रप्रदेशातुन आलेला भाविकांचा जथ्था होता. त्यातीलच एक महिलेला)
नम्रता :- ''काहो बाई, कुठल्या व तुम्ही आणि तुमचा नेकलेस तर खुप छान दिसत आहे. कोठून घेतला, कितीचा ...?
(प्रश्न ऐकुन त्या महिलेने आश्चर्याने फक्त हसून पाहिले.)
नम्रता :- (मनातल्या मनात... फारच शिष्ट दिसते बाई) ''अहो बाई, मी तुमच्याशी बोलत आहे.
भाविक म :- I dont no your longlegs please speak in Telagu or English
नम्रता :- ''अरे तुम्हाला मराठी येत नाही तरी तुम्ही महाराष्ट्रात मस्त फिरताय मजा आहे ? A Sorry.... u dont know our language but you filling comfortable at hear nice (तेवढ¶ाच त्यांचा गाईड तिथे येतो.)
गाईड :- Yes मॅडम, तुमच्या राज्यात आम्हाला काहीच प्राब्लेम नाही आला. मात्र आमच्या राज्यात असे नाही. कारण आम्हाला आमच्या मातृभाषेचा फार अभिमान आहे. त्यामुळेच आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या मातृभाषेतच बोलतो. आमच्या राज्यात आमचे सगळे व्यवहार फक्त मातृभाषेतच होतात.
प्रशांत :- आणि आम्ही जर तिथे आले तर..
गाईड :- तुम्हाला आमच्या भाषेतच बोलावे लागणार नाहीतर तुम्हाला फार अडचण येईल.
प्रशांत :- ''म्हणजेच मातृभाषा खुप महत्वाची''
(प्रसंग 6 - प्रशांत सरांचे घर)
(छोटा शुभम घरात बसून रिमोटने टी.व्ही. वरील वेगवेगळे च्ॉनल बदलत असतो. च्ॉनल बदलता बदलता एक साऊथ चे च्ॉनल लागते. छोटा शुभम ते लक्षपुर्वक पाहतो.)
प्रशांत :- अबे... तो काय पावू रायला भयताड ते आपली भाषा होव का ? थे काय समजीन तुले.
(शुभम लगेच चॅनेल बदलतो एक इंग्रजी च्ॉनेल लागते.)
प्रशांत :- हा.... आता कस.....! पोट्टा मस्त हुशार हाय ! हा तेच पायत जाय. पावू पावू शिकशील बाबु तु.
शुभम :- पण पप्पा मला हे काय बोलतात तेच समजतच नाही तर मी काय पाहू ?
(शुभम टी.व्ही. बंद करुन निघून जातो.)
प्रशांत मनातल्या मनात (खरच त्याच्या बाल मनासोबत मी किती अन्याय करत आहे त्याची जी भाषा मातृभाषा नाही, जी आपण घरात गावात बोलतही नाही तीच त्यान शिकावं हा अट्टाहास करतोय. नाही हे चुकीचे आहे. आता माझा निर्णय पक्का... माझ्या मुलाची शाळा ही जि.प. मराठी शाळाच राहणार.)
(शुभम चे वडील त्याला घेवून जवळच्या ISO मानांकित असणा·या जि.प.च्या शाळेत येतात त्याचा प्रवेश करतात पुढील प्रसंगात प्रशांत शाळेत जातो.)
(प्रसंग 7 - जि.प. शाळा)
दिपाली टिचर :- good morning student
student :- good morning teacher
दिपाली :- ''अरे वा. आज आपल्या वर्गामध्ये तुमचा एक नविन मित्र आला आहे वाटते, छान बाळा काय नाव तुझं ?
शुभम :- शुभम.... शुभम प्रशांत पाटकर
दिपली :- छान बर का मुलांनो तुम्हाला माती खेळायला आवडते का ?
सर्व मुले :- हो sss (मोठ¶ाने)
दिपाली :- चला तर मग आपण सर्वजण आज मातीचे गोळे बनवूया
(सर्व मुले आनंदाने मातीचे गोळे बनवितात.
घरी आल्यानंतर (प्रसंग 8)
नम्रता :- ''अहो ऐकताय काय ? आज शुभमच्या शाळेत त्याला मातीचे गोळे करायला लावले म्हणे ! किती डस्ट असेल त्यात.
प्रशांत :- डस्ट वौगेरे काही नाही अग त्या म्ॉडमनी राज्यस्तरावरुन मुलभूत वाचन विकास प्रशिक्षण पुर्ण केलेले आहे. आणि तुला सांगतो त्यांच्या प्रत्येक कृतीतुन मुले आनंददायी पध्दतीने शिकतील''
नम्रता :- ते कसे काय ?
प्रशांत :- अंग, पहिलीतील मुलांचे अक्षर चांगले येण्यासाठी त्यांच्या हाताच्या स्नायुमध्ये ताकद असावी लागते आणि त्यासाठीच मातीचे गोळे बनविणे, कागद फाडणे, कागद चुरगाळणे अशा कृतींमधुन ते कार्य होते. तु आता त्याची चिंताच करु नकोस !
(प्रसंग 9 - जि.प. शाळा)
दिपाली :- मुलांनो आणखी खेळ खेळायचे न.''
शुभम :- हो...... हो....... म्ॉडम
दिपाली :- चला तर मग !
(वेगवेगळ्या खालील कृती मुलांकडून केल्या जातात)
1) चालने - सरळ रेषेवर, नागमोडी, उलटे, अडथळे
2) उड¶ा - बेंडूक, ससा, कोलांटी, लोटांगण
3) खेळ - टायर फिरविणे, काचकवड¶ा
4) आकृतीबंध ओळखणे - आकृतीबंध कोठे कोठे आहेत? हे विचारात व साडीवरील काठची डिझाईन चे निरीक्षण, फुलांचे आकार, रंगोमेद्री चा वापर करुन प्रत्यक्ष कृती
5) डबीतील विविध वस्तुंचे आवाज ऐकविणे
6) गोष्टी ऐकवणे, गोेष्टी वाचुन दाखविणे
प्रसंग 10 वाचन पुर्वतयारी (शाळा)
दिपाली - ''मुलांनो (एक चित्र दाखवून) माझ्या हातातील चित्राचे निरीक्षण करा''
(मुले निरीक्षण करतात.)
शिक्षक प्रसंग व भावना दाखविणारे एक चित्र दाखवतात गटातुन म्ॉचींगसेट जोडून घेतात. चित्रपट्टीचे डावीकडुन उजवीकडे वाचन घेतात.
प्रसंग 11 (शुभमचे घर)
प्रशांत सर व नम्रता दोघेही बसलेले असतात
नम्रता :- '' अहो... गेल्या तीन महिन्यात आपला शुभम खुप बदललाय हो '' काल त्याने चक्क मला मराठीतुन एक पाठ वाचुन दाखवलाय होय किती छान वाचतो तो ''
प्रशांत :- '' आपल्या भाषेची ती बाहुच असते गं !''
नम्रता :- '' हो... ना... बरे झाले आपण त्याला मातृभाषेतुनच शिकवितोय आता तो नक्की चांगल्याप्रकारे शिकणार यावर माझा विश्वास बसलाय. आणि काल तर आमचे महीला मंडळ आपल्या घरी बसलेले होते. त्यांच्यासमोर आपल्या शुभम ने चक्क मीसेस राऊत यांनी विचारल्यावर साध्या एक्का चित्रावर एत्जीतुन गोष्ट तयार केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.''
प्रशांत :- '' अगं हो एकदा ना मातृभाषेतुन शिक्षणाचा पाया पक्का झाला की मुले हळुहळु इतर भाषाही आवडीने शिकतात. कारण त्यांच्यामध्ये आता नविन काही शिकण्याची जिज्ञासा तयार होत असते. ''
नम्रता :- '' नक्कीच हो ... माझ्या मौत्रीणीपण आता त्यांच्या मुलांना जि.प.च्या शाळेतच शिकवीणार आहे म्हणे.
प्रशांत :- ''नक्कीच माय मराठी.... जय मराठी ....!''