कायप्पावर वाचलेल्या मूळ हिंदी पोस्टचा 'भागवत'कृत स्वैर मराठी अनुवाद :-
■■ आम्ही कधीच उष्टं आणि शिळं अन्न खात नाही !!!
पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्याअगोदर जरा विचार करून बोला ■■
काही दिवसांपूर्वी आमचे एक परिचित आम्हाला एका अतिशय प्रसिद्ध अशा रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेले होते.
मी बहुधा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते. परंतु सामाजिक दबावाखाली कधी कधी जावं लागतं.
आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जातं. म्हणून त्यांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागवल्या.
प्लेटमध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे बघून मला थोडसं विचित्रच वाटलं. असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दाम कापून शिजवलेलं आहे.
मी वेटरला बोलावून त्या हाॅटेलच्या कुकला बोलावून आणण्यास सांगितलं. कुक आल्यावर त्याला मी विचारलं, "पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे का बरं आहेत?" तेव्हा तो बोलला, "ही आमची स्पेशल डिश आहे."
त्यावर मी त्याला म्हटलं की, 'मी आणखीन एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करतेय. पण मला ही तुमची स्पेशल डिश माझ्यासमोर बनवून दाखवा.'
आख्खं रेस्टोरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हादरून गेलं होतं...
हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले...
हाॅटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागला. शेवटी पोलीसच्या भीतीने वेटरनं कबूल केलं की जेवणारे लोक अनेकदा प्लेटांमध्ये अन्न, भाज्या कोशिंबिरी आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात. हॉटेलमधल्या स्वयंपाकघरातून हे सारं फेकून दिलं जात नाही. पनीर व भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना डिश दिली जाते.
बशांमध्ये शिल्लक राहिलेली कोशिंबीर नवीन ऑर्डरसाठी वापरली जाते. बश्यांमध्ये टाकून दिलेले सुक्या चिकन व मांसांचे तुकडे पुन्हा कापून ते करीमध्ये नव्यानं टाकले व शिजवले जातात. शिळ्या आणि सडक्या भाज्यासुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात...
हे मोठमोठ्या हॉटेलमधलं वास्तव आहे. यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला अथवा जेवण करायला जाल, तेव्हा उरलेलं अन्न एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला, किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हीच स्वतः फेकून मगच पुढे जा.
अन्यथा कदाचित तुमचं उष्टं अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेटमधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्टं अन्न असू शकेल.
दुसरा किस्सा भगवान कृष्णाची जन्मभूमि - वृंदावन येथील आहे. वृंदावनला पोहोचल्यावर, मी मंत्रमुग्ध होऊन तिथल्या पवित्र भूमीकडे पाहात होते. दिल्लीहून लांबचा प्रवास करून आल्यावर आम्हा सर्वांनाच कमालीची भूक लागली होती. म्हणून एका स्वच्छ दिसणाऱ्या उपहारगृहामध्ये आम्ही प्रवेशलो. उगीच ऑर्डरला वेळ लागू नये म्हणून आम्ही डिशऐवजी जेवणाच्या थाळ्या मागवल्या.
एका स्वच्छशा ट्रे मधून वरण, भाजी, भात, रायतं व सोबतच एक टोपलीतून चपात्या आणल्या गेल्या.
सुरुवातीचे काही घास घेताना लक्षात आलं नाही, पण मग नंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. मग लक्षात आलं की पोळी थोडी आंबूस लागते आहे, मग भाजीकडे माझं लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं की भाजीतील प्रत्येक तुकड्याचा रंग वेगळा आहे. मग भाताची चव घेऊन बघितली. तिथेही काहीतरी गडबड वाटली. सगळं जेवण तसेच टाकून आम्ही उठलो आणि मग काउंटरवर मी 'जेवणाचं बिल किती झालं', म्हणून विचारलं तर हाती साडेसहाशे रुपयांचे बिल ठेवलं गेलं.
मी म्हटलं, "भाऊ! पैसे तर मी देईन, पण एकदा मला तुमचा भटारखाना दाखवा." तो एकदम गडबडून गेला आणि मला विचारू लागला, "कां? काय झालं?"
मी म्हटलं, "जो पैसे देतो त्याला जेवण साफ बनतंय की नाही, हे पाहण्याचाही हक्क आहे."
तो काही बोलण्याआधीच मी हॉटेलच्या भटारखान्यात शिरले.
आत शिरल्यावर स्वयंपाकघरात कसलाही पदार्थ शिजत नाहीये, हे पाहून माझ्या आश्चर्याला काही पारावार उरला नाही. एका टोपलीत काही पोळ्या ठेवल्या होत्या. फ्रीज उघडून बघितला तर आंत उघड्या भांड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शिजलेल्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. काही भाज्यांना तर चक्क बुरशी लागली होती.
फ्रीजमधून सडका वास बाहेर पडत होता. आचाऱ्याला दरडावून विचारल्यावर ह्या साऱ्या भाज्या एक आठवड्याइतक्या शिळ्या असल्याचं त्यानं कबूल केलं. वाढताना याच शिळ्या भाज्यात तेल टाकून व कढईत गरम करून आपण त्यात कोथिंबीर व टमाटू टाकून डिशमध्ये ग्राहकांना सर्व्ह करीत असतो, हेही त्यानं मान्य केलं.
कणिक आपण केवळ एक दिवसाआडच मळतो.
किती किती तास वीज जाते तेव्हा खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. ते लपविण्यासाठी त्यांत तिखट आणि भरपूर मसाले टाकून डिशेस सर्व्ह केल्या जातात. तिंबलेली शिळी कणिक खराब झाली असेल तर तीच 'नान'साठी सर्रास वापरली जाते.
मी रेस्टॉरंटच्या मालकास बोलले, "तुम्हीही कधीतरी यात्रा करीत असालच, ईश्वर करो, जेव्हा पुढील यात्रेच्या वेळेस तुम्ही भुकेनं अगदी व्याकुळ झाला असाल, तेव्हा तुम्हाला बिलकुल असंच जेवण मिळावं, जसं तुम्ही तुमच्या ग्राहकांना खाऊ घालता." माझं हे बोलणं ऐकून त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला....
आज आपल्याला संकटं, धोके व फसवणुकीपासून केवळ आपली जागरूकताच वाचवू शकते. कारण आता देवालाही दुष्टांनी घेरलेलं आहे.
भारतातून योग्य आणि अयोग्य यांतील फरक संपत चालला आहे....
प्रत्येक दुकानात वा प्रतिष्ठानात एका कोनाड्यात देवाचं मोठं वा लहान मंदिर पहायला मिळेल, व्यापारी सकाळी येताच देवाच्या मूर्तिसमोर धूप, दीप लावतो, गल्ल्याला नमस्कार करतो आणि मग दुकानातील सामानासोबतच स्वतःचा आत्मा विकण्याचा धंदा सुरू होऊन जातो!!!
देवाजवळ मागणं मागताना दुकानदार हा विचार करीत नाहीत की, ते स्वतः जगाला काय देतायत!!
जागरूक व्हा!!
दुसरा कुठलाच उपाय नाही.
कमीत कमी पाच समूहांना नक्की अग्रेषित करा.
काही लोक नाही पाठवणार.
पण मला विश्वास आहे की तुम्ही तरी नक्कीच पुढे पाठवाल.
🙏🙏🙏🙏
भयंकर 😨 आहे हे.. काळजी घ्यायलाच हवी. 🥱🥱