लक्ष्मण ओंकार कोल्हे ,हे माझे सासरे होते. सादगी पूर्ण जीवन,सदा कर्म योगी,सफल व्यवसायी होते.आपल्या परिवार मधे सर्वांना बरोबर घेऊन चालणारा व्यक्ती.लहानपणा पासून कर्म योगी राहणारा हा साधारण व्यक्ती परिवारास असाधारण व्यक्तित्व होता.लग्न झाल्यावर मला त्यांची असीमित कार्यकुशलता चे भान झाले. सायकिल वर आठवडे बाजारात ,नंतर मोटसायकलवरून बाजारात कापड दुकान चालवली.
नंतर वरणगाँव येथे लहानशी टपरी वर कापड विकणे प्रारंभ केले.त्या वेळेस कोणा कोणाच्या मनात हे नव्हत की ह्या जागे वर काही वर्षा नंतर चारमजली कापड शोरुम उभा राहणार आहे.ह्या प्रगति मधे त्यांची धर्मपत्नी आणि मुलं मुलींचा व सुनांचा पण पूर्ण योगदान राहिला.तरी मी त्या व्यक्ती ची तुलना एक वटवृक्षाच्या प्रमाणे करतो .बाकी ची तुलना सर्व त्यांच्या प्रेमळ सावली खालती उभे राहिले प्राण्यांशी करतो.एक छोट्याशा घरात यावल उन येऊन सासू बाई ने घर आणि परिवार साम्हाहाळले त्यांना पूर्ण व्यवसाय मधे प्रगती करावयास मदद केली.भुसावळ शहरात सुराणा बिल्डिंग,गंगाराम प्लॉट सर्व संपन्न लोकांच्या मधे हा सामान्य परिवार राहतं होता .पण कधी वाटलं नाही कि सामान्य आहे हा परिवार.काटकसरी ने जीवना ची ट्रेन संभ्रांत तरिक्या ने ह्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर माझ्या सासू सासरे
दोघांनी मिळून उभे केले.